पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण चौथे. ५५ पट्टणास त्र्यंबकराव मामांनी जो वेढा दिला होता त्यांत ते सामील झाले. पानशांचे ** गोळे ( हैदरच्या ) राजवाड्याजवळ उतरतात " ( कित्ता ). याप्रमाणें हैदर पक्का कोंडला गेल्याने अखेरीस त्र्यंबकरावांनी सांगितल्याप्रमाणे, तो दातीं तृण धरून मराठ्यांस शरण आला व अखेरीस तह केला. ही त्याच्यावरील तिसरी मोहीम खलास झाली. ( त्याच मोहिमेंतील पाईन घाटावरील त्र्यंबकराव मामांच्या स्वारींतसुद्धां पानशांनी आपली कामगिरी उत्तम प्रकारे बजाविली आहे. ). कर्नाटकांत याप्रमाणे मोहिम चालू असतां, इकडे सातारकर भोसल्यांचे नेहमीचे प्रतिस्पर्धी कोल्हापूरकर यांनी सातारकरांच्या राज्यांत धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. शके १६८५। ८६ च्या सुमारास पेशवे सरकारांनी कोल्हापूरकरांपासून चिकोडी व मनोळी हे दोन परगणे घेतले होते. व ते पांच वर्ष आपणाकडे ठेवून पुन्हा काही शर्तीवर त्यांस परत दिले होते. पण, त्या करारांतील अटींप्रमाणे कोल्हापूरकर वागले नाहीत; म्हणून पुन्हा ते परगणे आपल्या ताब्यांत घेण्याचा पेशव्यांनी निश्चय करून रामचंद्र नाईक परांजपे व भिवराव पानसे यांच्याबरोबर सहा हजार फौज व तोफखाना देऊन त्यांस कोल्हापूरकरांवर शके १६९२ कार्तिक शुद्धांत पाठविले. शिवाय वरील सरदारांच्या कुमकेस म्हणून, नरसिंगराव धायपुडे व अक्कलकोटकर भोसले हे धारवाडास होते, त्यांना हि त्यास जाऊन मिळण्याची आज्ञा केली. त्या आज्ञेप्रमाणे ते त्यांना येडूर मांजरी या ठिकाणी जाऊन मिळाले. नंतर या सर्व फौजा मिळून त्यांनी चिकोडी तालुक्यांतील कोल्हापूरकरांची सर्व ठाणी काबीज केली आणि भौज, कागल ही मातब्बर ठाणी हि घेऊन कोल्हापुराजवळ येऊन तळ दिला. तेव्हां निरुपाय होऊन कोल्हापूरकरांनी चिकोडी व मनोळी या दोन्ही परगण्यांच्या सोडचिठ्या देऊन, खारीखर्चासाठी एक लक्ष दहा हजार रुपये दिले व पेशव्यांशी तह केला. हा जय घेऊन पानसे व परांजपे हे पुण्यास परत आले. या स्वारीत, कर्नाटकांत मुतलाबी येथे ( मागे सांगितल्याप्रमाणे ) छावणीसाठीं जो तोफखाना ठेविला होता तो भिवरावांनी आणविला होता. मुख्यतः त्याचेच सामर्थ्यावर कोल्हापूरकरांचा लवकर पाडाव करतां आला. वरील कर्नाटकाच्या मोहिमेंत पानशांच्या संबंधीचा आणखी एक प्रसंग घडला, तो, येथे सांगण्यासारखा आहे. * मोती तलावा” ची लढाई झाल्यानंतर त्र्यंबकराव मामांनी मेळकोटे या हैदरच्या मजबूत ठाण्यावर हल्ला करून, ते ठाणे काबीज केले. या हल्लयांत आनंदराव माधव वगैरे पानसे मंडळी होती. ठाणे पडल्यावर मराठ्यांच्या सैन्यांतल बाजारबुणग्यांनी ते गांव लुटले. हे गांव विशिष्टाद्वैत मताचे मूळ स्थान असल्याने, तेथे त्या पंथाचे गुरु रामानुजाचार्य राहात होते. येथे विष्णूचे एक पुरातन देवस्थान आहे. त्याला तिकडे चिलपिल्लराय असे म्हणत. बाजारबुणग्यांनी हे देऊळ लुटले व त्याची मोडतोड केली. या सुमारास या देवळांतील एक लक्ष्मीनारायणाची