पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पानसे घराण्याचा इतिहास. णीस राहिले आणि त्यांच्या मदतीस पटवर्धानादि जे सरदार राहिले त्यांत आनंदराव ( कृष्णराव ) माधव पानसे राहिले वगैरे हकीगत वर आली च आहे. त्र्यंबकरावांनी १६९२ च्या पावसाळ्यांत हि हैदराचा प्रांत काबीज करण्याचा सपाटा चालविला होता. तरीपण तो तह करीना, म्हणून पुण्याहून सरकारांतून आप्पा बळवंत व मल्हारराव पानसे यांना १० हजार स्वार, १५ हजार गारदी व बहुतेक तोफखाना देऊन, पेठे मामांच्या मदतीस पाठविण्यांत आले. श्रीमंत माधवरावसाहेव स्वतः स्वारीवर निघून कांहीं मुक्कामावर गेलेही होते; पण मध्येच प्रकृति बिघडल्याने ते परत पुण्यास आले. त्याबद्दल त्यांनी श्रीमंत गोपिकाबाई साहेबांना एक पत्र लिहिले आहे. त्यांत लिहिले आहे की, “आप्पा बळवंत मेहेंदळे व मलबा ( मल्हारराव ) पानसे यांना पाठवितों ' ( खरे ऐ. ले. सं. पृ. १७४२ ). त्याप्रमाणे आप्पा बळवंत व मलवा पानसे यांची तिकडे रवानगी झाली. ही रवानगी शके १६९२ च्या पौष शुद्ध त्रयोदशीच्या पूर्वी झाली. कर्नाटकांत आनंदराव ( कृष्णराव ) माधव पानसे हे अगोदरपासून होते च. या आनंदरावांनी बहुधा एखादा यज्ञ वगैरे केला असला पाहिजे असे दिसते. कारण, त्यांना वामनराव पटवर्षांनी आपल्या एका पत्रांत * आनंदराव दीक्षित तोफखाना' असे संबोधिलें आहे ( कित्ता १७५८ ). ही गोष्ट नवीन आढळली असे या वरून समजण्यास हरकत नाही. कारण पानसे दप्तरांत अद्यापि ही माहिती लिहिलेली उपलब्ध झाली नाहीं; असे. त्र्यंबकराव मामांनी या सुमारास हैदरचा जेवढा प्रांत काबीज केला, तेवढा घेतांना ज्या लढाया झाल्या, या लढायांत प्रत्यक्ष समरांगणावर आनंदराव ( कृष्णराव ) पानसे हजर होते व त्यांच्या तोफखान्याने या लढायांत उत्कृष्ट कामगिरी हि केली. एकदां तर हैदराची तीस चाळीस हजार फौज एके ठिकाणी मुक्कामास असतां सखाराम हरि व आनंदराव पानसे यांनी त्यांच्या थेट लष्करां ( गोटा ) पर्यंत जाऊन कही लुटली. उंट, तट्टे व पांच सात हजार बकरी वळवून आणली. ( हैदरच्या ) गोठाच्या आसपास एक कोसाच्या अंतरें भाल्यास पासोड्या बांधोन, त्यामुळे मातवर फौज आली. अशी दिखाई देऊन, आनंदराव तोफखाने व भवानजी जाधव यांस वाट तट पाहावयास पाठविले. ( मराठ्यांची ) * फौज मातब्बर असती, तर काम पोख्त झालें असते. पण, बातमीस तीन शें राऊतांसहित गेल्यासारखे त्यांनी काम केले ” ( कित्ता १७७२, १७७३ ). म्हणजे, मराठ्यांची ही सारी फौज तीन शेंच होती व ती हि हैदराचा तलास काढण्यासाठी गेली होती; असे असतां सखाराम हरि ( गुप्ते ) व आनंदराव ( पानसे ) यांनी ही अतिशय बहादूरीची व अत्यंत धाडसाची गोष्ट केली ( शके १६९२ फाल्गुन ). याखेरीज मुरुमकांडाच्या, ( भाद्रपद ) व मोती तलावाच्या ( फाल्गुन ) लढाईत हि पानशांच्या तोफखान्याने बरीच महत्त्वाची कामगिरी बजाविली. मोती तलावाच्या लढाईत तर “ सरकारच्या तोफा लागू झाल्या तेव्हां हैदर पेचांत च आला ( कित्ता ). पुण्याहून निघालेले अप्पा बळवंत व मलवा पानसे हे श्रीरंगपट्टण येथे शके १६९३ च्या चैत्रांत जाऊन दाखल झाले व तत्काळ, श्रीरंग है