पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण चौथे. ५३ - याच वर्षी, पानशांच्या कर्नाटकांतील कामगिरीवर खूष होऊन, श्रीमंत थोरले माधवरावसाहेब पेशवे यांनी आश्विन वद्य प्रतिपदेस मौजे दिवे येथे आणखी नवन तीस बिघे जमीन, कृष्णाजी माधवराव व भिवराव यशवंत यांना योगक्षेमार्थ म्हणून इनाम करून दिली ( परिशिष्ट क्रमांक ११ पहा ). पुढे त्याच जमिनीपैकी पंधरा बिघे जमीन पानसे यांनी आपले उपाध्ये घोडे यांना दिली. कृष्णाजीपंत व भिवराव यांच्याप्रमाणे कर्नाटकांत मल्हार ( ऊर्फ मलबा ) जगजीवन यांनी हि सरकारचाकरी उत्कृष्टपणे बजाविली होती. तेव्हां त्यांना हि इनाम देणे आवश्यक झाले होते; त्यामुळे त्यांना व त्यांचे बंधु शामराव यांना श्रीमंतांनी दिवे येथे च दुसरी पंधरा बिघे जमीन नवीन इनाम करून दिली, अद्यापि ती त्यांच्या वंशजांकडे चालत आहे ( परिशिष्ट क्रमांक १२ पहा ). _ याचवेळी आणखी एका जुन्या भानगडीचा निकाल पानशांनी आपल्या तर्फे करून घेतला. मौजे वेलवंडी येथील महाजनकी व औटकी ( आवटीपणाचे वतन ) ही दोन्ही वतने पुष्कळ दिवसांपासून पानशांची होती. मध्यंतरी सदरचा गांव सगुणाबाई शिंदे यांस इनाम मिळाला. तेव्हां पानशांच्या या वतनी हकांना अडथळे उत्पन्न झाले. शिवाय जोपर्यंत शेतसारा ऐन जिनसी वसूल होत असे, तोपर्यंत पानशांना अटकीचे उत्पन्न बिन तक्रार मिळत असे. पण, पुढे गांव ( शिंद्यातर्फे ) खंडाने देण्यात आला. त्यामुळे पानशांना हें औटकीचे उत्पन्न मिळेनासे झाले. त्याची तक्रार पानशांनी मधून मधून चालविली होती, पण या तक्रारीस त्या वेळी विशेष यश आलें नाहीं. कर्नाटकांतून परत आल्यानंतर मात्र पानशांनी या प्रकरणी जोराची तक्रार केली. तेव्हां श्रीमंत माधवरावसाहेबांनी सगुणाबाईच्या संमतीने, या हक्काच्या ऐवजी, सदर गांवीं रयतेच्या मालकीच्या जमिनीपैकी नवीन ७२ बिघे जमीन, कृष्णराव व भिवराव यांच्या नांवांनी इनाम करून दिली. ही जमीन अझूनपर्यंत पानशांच्या घराण्याकडे चालू आहे. या प्रमाणे, हैदरावरील तिसच्या स्वारींत पानशांनी बराच पराक्रम गाजविल्याने श्रीमंत पेशवे सरकारांनी त्यांनाही नवीन इनामे करून दिली. कृष्णराव, भिवराव व मलवा यांच्या सारखे एकनिष्ट व स्वामिभक्त सरकार-चाकरीत प्राणांकडे हि न पाहणारे सेवक, जसे त्या वेळी होते, तसे च, असल्या सेवकांची बूज राखणारे आणि त्यांना मोठ्या योग्यतेस पोहोचविणारे श्रीमंत थोरल्या माधरावसाहेवासारखे जाणते धनी हि पण त्या काळी होते. त्यामुळे पराक्रमाचे चीज चांगले होऊन वीरवृतीस उक्तेजन मिळाले. आतां तो काळ बदलला. सांप्रत तसे चाकर नाहीत व धनी तर नाहींत च नाहीत. हा सर्व या काळाचा महिमा होय. ७. हैदरअल्ली व कोल्हापूरकर यांवरील मोहीम, हैदरावरील या तिसच्या स्वारीचे शेपूट अद्यापि कायम राहिलेच होते. पेशवे व पानशांची काही मंडळी परत पुण्यास आली व कर्नाटकांत त्र्यंबकराव मामा पेठे छाव