पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पानसे घराण्याचा इतिहास. वरील मंडळींतील त्र्यंबक व्यंकाजी यांनी काळेगांवची पाटिलकी, महाजनकी व शेटेपण ही वतने खरेदी केली. बरवाजी बिन जानजी पाटील कुटे राहणार काळेगांव परगणे नेवासे सरकार अहमदनगर याचे मालकीची मिराशी पाटिलकीची तिसरी तक्षीम शके १६१५ च्या सुमारास ८०१ रुपयांस पानशांनी खरेदी केली व मौजें मजकुरीं नवे पेठेची वसाहत केली. त्याचे शेटेपण व महाजनकी वतन दरोवस्त या वरील रकमेत खरेदी केले. त्या वतनावर असतांना, पानसे यांनी, तेथे वाडा बांधला. व कालेश्वराचे मागे विहीर वांधली. पुढे, विपरीत काळ आल्यावर त्र्यंबकपंत देशांतरास गेले. त्यांचे बंधु कृष्णाजी व्यंकटेश है वतन वहिवाटून खात होते. त्यांनी पुढे. गुमास्ता ठेविला व आपण साता-यास रोजगारानिमित्त आले. साता-यास त्यांनी हरि-- पंतास दत्तक घेतले व पुढे ते गुजराथेंत सोनगडाकडे रोजगारासाठी गेले; ते तिकडे च वारले. त्यामुळे इकडे वतनाची पूसतपास कोणी केली नाही. त्याचा फायदा घेऊन गुमास्त्याने वतनाचा महजर, शके १६२० बहुधान्यनाम संवत्सरे ज्यष्ठ वद्य १ रोजी, शामजी नाईक मांडे यांचेकडे ९५१ रुपयांस गहाण ठेविला. शिवाय, मूळचे खरेदीखतापैकी कांहीं देणे, तसेच राहिले होते. वतन गहाण ठेवून गुमास्त्याने जे कर्ज काढले त्यास व्याज दरमहा दर शेंकडा पांच रुपये होते ! पुढे, शके १६९० च्या सुमारास श्रीमंत पेशवे सरकारची स्वारी या प्रांतांत आली; त्या वेळी त्यांच्या सैन्यांत कृष्णाजी माधवराव वगैरे पानसे मंडळी होती. सैन्याचा मुक्काम सांवखेडे येथे असतांना काळेगांवच्या या वतनाची हकीकत कृष्णाजीपंतास समजली. त्यावर त्यांनी तेथे त्या संबंधाची पुरी चौकशी केली. त्यानंतर श्रीमंतांची स्वारी पुण्यास परत आल्यावर कृष्णराव यांनी हरिपंतांच्या मुलांचा शोध केला. हरिपंतास वर सांगितल्याप्रमाणे सहा मुले असून ती या वेळी भोळी, तोंडल येथे रहात असत. त्यांना कृष्णरावांनी बोलावून आणले व वतनाचा प्रश्न काढला. त्यावर, त्यांनी ** आमचा पडता काळ आहे, सबब आमच्याने हे कर्ज फिटून.उत्पन्न मोकळे होणार नाही, तरी आम्हांस दहा हजार रुपये दिल्यास, त्यांतून हे सारे कर्ज वारून, सर्व इनाम जमीन, वाडा, तुम्हांस खरेदी देतो.' असे सांगितले. त्यावरून कृष्णरावादि पानशांनी त्यांना रुपये दिले आणि कृष्णाजी माधवराव, जयवंतराव यशवंत, सखाराम यशवंत, विश्वासराव यशवंत, पुरुषोत्तम यशवंत, भिवराव यशवंत व व्यंकटराव केशव पानसे रहाणार सोनोरी यांनी, शके १६९१ विरोधी नाम संवत्सरे ज्येष्ठ वद्य नवमी बुधवारी, वरील वतनांचे खरेदीपत्र आपल्या नांवांनी करून घेतले. तेव्हापासून आतांपर्यंत हे वतन या घराण्याकडे सतत चालू आहे. दुस-या एके ठिकाणी हे खरेदीपत्र या वर्षाच्या विजया दशमीला झाल्याचा उल्लेख आहे. तसे च आमच्या आढळण्यांत शके १६८५ च्या सुमारचे एक वांटपपत्र आले, त्यांत या पाटिलकीच्या वतनाचा. नामनिर्देश केलेला आहे. '