पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३ ) बहादुरांस व इतर पानसेकुलोत्पन्नांस सप्रेम सूचना करतों की त्यांनी पानसेकुलसंमेलनसंस्था लवकर काढून कायम करावी. वाटल्यास जो सर्व कुलाचा परंपरेचा श्रीकृष्ण-जन्मोत्सव हल्लीं मंदावत चालल्याचे या इतिहासांत नमूद केले आहे, तो चे उत्सव यासाठी कायम करावा आणि या उत्सवास नवे कालानुरूप वळण द्यावें. पानसे घराण्यांतील कोणा हि स्वीस किंवा पुरुषास, मुलास किंवा मुलीस शिक्षणाची किंवा हर प्रकारें उन्नति करून घेण्याची सोय करणे हा या संस्थेचा हेतु ठेवावा आणि चालू सहकारी तत्त्वावर संस्था उभारावी.या पुरस्कारांत ही सूचना एवढ्याचसाठी केली की, अशा संमेलनाचे योगानें कुलतिहासाची अधिक चांगली रचना होण्यास साहाय्य होईल, अशा स्वकुलसंमेलनाची पद्धति जर आपल्या समाजांत रूढ होईल तर कुले तिहासाची माहिती - परस्परपरिचयाने सहज मिळेल. इतर फायदे हि अनेक होतील. दुसरी एक सूचना येथे करतो. जे जुने वाडे, मंदिरें, मूर्ति इत्यादि अद्यापि शिल्लक असतील त्यांचे मस्विदे-स्केचेस-काढून तयार करावे व मूळ ठिकाणी एक प्रदर्शनागार करून तेथे घराण्यातील महत्त्वाचे कागद,चित्रे,स्मारक वस्तु,वगैरे एकत्र समाईक ठेवाव्या. म्हणेज पुढील पिढ्यांस तसेच इतरांस त्या एकदम दृष्टीस पडून मोठा लाभ होईल. मस्विदे अवश्य तयार करावले पाहिजेत. कारण जुन्या इमारती, मंदिरे ही भराभर पडत झडत चालली आहेत. त्यांस चित्ररूपाने तरी आपण जगविले पाहिजे. शिवाय अशा स्थळांच्या व वस्तूंच्या यथादर्शनपद्धतीच्या कांचा ( Stereoscopic Slides ) तयार करून ठेवाव्या. इमारती पडून गेल्या तरी त्यांचे देखावे यथास्वरूप आपणास दिसू शकतील अशी ही नामी युक्ति आहे. मास्वदे करविणें पानसे मंडळीस अवघड नाही, कारण बहुतेक पानसे मंडळी या वास्तुशास्त्रांतच वाकव झालेली दिसत आहेत. त्यांनी मनावर घेतल्यास हे कार्य सहज होईल. इतरांस उदाहरण होईल हे वेगळे च, आणि याचसाठी येथे जाहीरपणे या सूचनेचा उच्चार केला आहे. रावबहादूर आप्पासाहेब यांनी हा सर्व कुलेतिहास शालिवाहन शकांत चिला है कित्येकांस रुचणार नाहीं; परंतु रावबहादुरांनीं साहजिकपणे केलेली ही गोष्ट पुष्कळ बोधप्रद आहे यांत संशय नाहीं. शेलून चालून हा आराखडाच आहे. त्यांत कमी अधिक जरूर करावे लागेल. उदाहरणार्थ फारेस्टरने, केशवराव पानसे रामकिशवीच्या लढाईत १७ ऑगष्ट १७६३ त पडले असे म्हटले आहे ( पृष्ठ ६८७।६८८ ). ही राक्षसभुवनची दंगल दिसते. उदगीरांत केशवराव पडले हे या ग्रंथांत रावबहादुरांनी दाखविले आहे. याचा अधिक उलगडा झाला पाहिजे. कांहीं अशुद्धे आतां च शुद्धिपत्राने दूर होतील. पण अशी स्थळे सबंध ग्रंथांत सुमारे वीस पंचवीस च आम्हांस आदळली. तसेच सोबत जोडलेले मूळ कागद यांतील कित्येक जुन्या छापलेल्या वरूनच कोठे कोठे घेतले आहेत, ते छापिले त्या वेळी हल्लीं झालेली माहिती व उलगडे झालेले नव्हते.