पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ४ ) आतां या चुका दुरुस्त करण्यासारख्या आहेत. उदाः-वाडांचा सनदा-पत्रांचा खंड हा मोडी वाचनाच्या चुकांनी ग्रासलेला आहे. त्यामुळे त्यावरून घेतलेल्या कागदांत लाइर्णाबद्दल कइणी (पृ. १७२ ) पडणे सहजच आहे. तीच गोष्ट विरामचिन्हांची. हीं चिन्हें मूळ कागदांत नसतात त्यापक्षी न द्यावी हे उत्तम. मुळांत जेवढा बदल कमी होईल तेवढा शास्त्राचे दृष्टीने बरा. असो. हा ग्रंथ तयार होत असल्याबद्दल व तो पाहण्याबद्दल आम्हांस कै. रावसाहेब सावळारामपंत पानसे यांनी जातीने येऊन खबर दिली होती. परंतु पुढे त्यांचे मृत्यूमुळे तो प्रसंग तितकाच राहिला; परंतु रावबहादुरांनी हि तोच संकेत कायम ठेवून आयता ग्रंथ छापून मंडळाचे पुरस्कृत-मालेत दाखल केला याबद्दल मंडळास फार संतोष वाटत आहे. या ग्रंथांत भर टाकून याच्या पूर्वीचा भाग शक्य तितका विस्तृत करण्यास आणि पुढे नवनि कर्तृत्वाचे नवीन भाग जोडण्यास पानसे मंडळी आळसु करणार नाहीत अशी दृढ आशा व्यक्त करून हा प्रेमपुरस्कार संपवू. आश्विन शुद्ध ६ शके | १८५१, पुणे. मंडळाचे अज्ञेवरून दत्तो वामन पोतदार | चिटणीस, भारत-इतिहास-संशोधक-मंडळ, पुणे. शीप:- हा ग्रंथ भा. इ. सं. मंडळाचे सभासदांस खास सवलतीने म्हणून रु.२--८:: किंमतीस मंडळाकडे मिळेल, . . ...... . ..