पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २ ) खंडित स्वरूप आलेले आहे. हा ग्रंथ म्हणजे पहिला आराखडा आहे आणि म्हणून च * सर्वांरंभा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः " हा न्याय येथे लागू करून मग च असे क्रंथ पारखले पाहिजेत. आपला विषय नसतांना देखील रावबहादुर आप्पासाहेब यांनी ही ग्रंथरचना केली ती खरोखर च फार प्रशंसनीय आहे असे आम्हांस वाटते. - राष्ट्राचा इतिहास हा त्यांतील कुळांच्या इतिहासाचा च बनलेला असतो. यामुळे खरे व विस्तृत कुलेतिहास जितके होतील तितके आपणांस अवश्य पाहिजे आहेत, हे। कुलौतहास लिहितांना कुलाभिमान योग्य मर्यादेत ठेवून सत्यकथनाची दृष्टि जागरूक राखली पाहिजे हे सांगावयास नको. उलट अशा पुस्तकांतून कुलाभिमानाचा अंश जरा आधक दिसून आल्यास तिकडे ' चंद्रकलंकन्याया' ने च पाहिले पाहिजे. आपटे-बर्वे-गोखले-पटवर्धन इत्यादि घराण्यांचे इतिहास कै. गोविंदराव आपटे यांनी तयार केले. नंतर आमच्या मंडळाच्या पुरस्कृत ग्रंथमालेत वाठारकर-निंबाळकर घराण्याचा इतिहास प्रसिद्ध झाला. आज हा पानसे घराण्याचा इतिहास मंडळाच्या पुरस्कृत ग्रंथमालेत दाखल होऊन कुलेतिहासग्रंथांत चांगली भर पडत आहे. - पुरस्कृत ग्रंथमालेतील ग्रंथांत स्वीयमालेतील ग्रंथांपेक्षां. अधिक.स्वातंत्र्य लेखकांस दिलेले असते. ग्रंथांतील किंवा लेखांतील विधानांची जबाबदारी सर्वस्वी ग्रंथकाराची किंवा लेखकाची हे तत्त्व सर्वमान्य आहे. पुरस्कार करणा-यांची जबाबदारी केव्हांही मर्यादित च असते. मंडळाचे बाजूने पाहिले तर सर्व ऐतिहासिक धराणी मंडळास सारखी. परंतु लेखकांचे किंवा शोधकांचे मताने त्यांत तारतम्य येणे हि तितकेंच योग्य आहे. शिवाय पूर्वी घराण्याघराण्यांमध्ये वितुष्टें होती किंवा एका घराण्याचे शाखांत वितुष्टें होती म्हणून ते अभिमान किंवा अभिनिवेश मिरवीत बसणें हें कांहीं आपले ध्येय आतां असतां कामा नये. आतां नवी सृष्टि होत आहे; तिच्या घडणीस व सर्वांच्या प्रगतीस पोषक होईल अशीच आपल्या सर्व क्रियांची मांडणी आपणांस केली पाहिजे. यास्तव रावबहादुर यांनी कचित् कोठे आपले अभिप्राय व्यक्त करतांना कमी आधिक लाहले असेल तर वाचकांनी त्यांच्या शुद्ध हेतूंकडे लक्ष द्यावे, अशी आमची त्यांस विनांति आहे. ग्रंथ छापून निघाल्यावर आमचे अवलोकनासाठी आला ! १.९८ वर एका ज्ञातीचा केलेला उल्लेख अधिक काळजीपूर्वक करावयास पाहिजे होता. असो. तरी कुत्र्याच्या कर्मापेक्षां शुद्ध हेतूंवर च नजर देण्यास कोणी विसरू नये म्हणजे व्यर्थ वाद व गैरसमज माजणार नाहीं. | सविख्यात सरदेसाई घराण्याचा सांगोपांग इतिहास नुकताच दोन मोठ्या खंडांत प्रसिद्ध झाला आहे. परंतु इतिहास प्रसिद्ध करून च ही मंडळी थांबली नाहीत, तर यांनी श्री. दादासाहेब मावळंगकर अहमदाबाद यांच्या प्रेरणेने समस्त-सरदेसाईसंमेलन भरविण्याची फार उत्तम कल्पना अमलात आणून दोन संमेलने पार हि पाडली. हे उदाहरण फार अनुकरणीय आहे असे आम्हांस वाटते, म्हणून आम्हीं राव