पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५१ प्रकरण चौथें. ( पानसे ) यांस पाठवावें; नाहीं तरी खैराती तोफा आल्यास ठीक नाहीं. डोंगरावरी तोफा चढवाव्या लागतात " ( कित्ता ) असे म्हणून गोपाळरावांनी आनंदराव पानसे यांस पाठविण्याबद्दल लिहिले आहे. यावरून किल्ला घेण्याच्या या कामांत पानशांच्या, विशेषतः (आनंदराव ) कृष्णराव माधव पानसे यांच्या तोफखान्याने उत्कृष्ट कामगिरी बजाविली, हे उघड दिसते. याप्रमाणे या स्वारीचा शेवट झाला. या स्वारींत मराठ्यांनी हैदरचा सुमारे एक कोट उत्पन्नाचा मुलुख लुटून फस्त केला, तरी हि हैदर हा पेशवे मागत होते तेवढी खंडणी देईना आणि तह हि करीना. तेव्हां श्रीमंतांनी सर्वांच्या विचारे असे ठरविले की, आपण स्वतां देशीं जावे व पावसाळा संपल्यानंतर दसरा करून पुन्हा इकडे यावे व तोपर्यंत करनाटकांत कांहीं मराठी फौज छावणीस ठेवावी. ठरल्याप्रमाणे फौजेवर मुख्य त्र्यंबकराव मामा पेठे यांना नेमले व त्यांच्या मदतीस मुरारराव घोरपडे, पटवर्धन, रास्ते, गायकवाड, आनंदराव गोपाळ इत्यादि सरदार ठेविले. तोफखान्यापैकी आनंदराव माधव पानसे हे मदतीस राहिले. यांच्या जवळ या वेळी पांच तोफा होत्या व त्यांचा मुकाम मुतलाबी येथे होता. नंतर कांहीं हुजुरांत, नारो शंकर, साबाजी भोंसले, आप्पा बळवंत, मल्हारराव पानसे, भिवराव पानसे व इतर कांहीं सरदार यांस बरोबर घेऊन श्रीमंत परत फिरले. ते शके १६९२ च्या जेष्ठ वद्य पंचमीस पुण्यास येऊन पोहोंचले. पुण्यास परत आल्यानंतर पानसे यांनी मौजे काळेगांव येथील वतने खरेदी केली. त्या संबंधीची हकीकत पुढीलप्रमाणे आहे. ६. मौजे काळेगांव व इतर ठिकाणे येथील इनामें, पानशांच्या घराण्यापैकी भोळी तोंडलच्या शाखेत काळभट नांवाचा पुरुष शके १५८० च्या सुमाराम होऊन गेला. त्यास व्यंकाजी व काशीपंत नांवाचे दोन पुत्र झाले. व्यंकाजीपंतास त्र्यंबक, कृष्णाजी, रघुनाथ व नरहर नांवांची चार मुलें होती, त्यांत कृष्णाजी शिवाय बाकीच्यांचे नक्कल झालें. कृष्णाजीस पुत्र नसल्याने त्याने हरि नांवाचा पुत्र दत्तक घेतला. काळंभटाचा दुसरा पुत्र काशीपंत व त्याचा पुत्र गोविंदपंत होय. गोविंदपंतास दोन पुत्र होते. एक व्यंकाजी व दुसरा हरि. या हरीस कृष्णाजी व्यंकाजी यांनी दत्तक घेतले. या हरि कृष्णाजीस आनंदराव, कृष्णाजी, गाविद, रघुनाथ, महादाजी व विश्वनाथ इतकी मुले झाली. । * काळभंट व त्याच्या वंशजांची जी नांवे दिली आहेत ती मुद्गल गोत्री पानशांच्या वंशवेलांत सांपडत नाहींत. खडके आडनांवाचे मुद्गल गोत्री घराणं पानसे यांनी भाऊ मानल्यामुळे ते पानसे आडनांव लावू लागले. त्यांच्या घराण्यांतील हे पुरुष असावेत असे वाटते. या घराण्याची वस्ती हल्लीं शिरवळ प्रांतीं भोळी या गांवीं आहे.