पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५० पानसे घराण्याचा इतिहास. स्वारींत श्रीमंतांनी अनेक विकट किल्ले व ठाणी सर करून घेतली, त्यांत कोठे हि त्यांना अपजय आला नाही, याचे कारण त्यांचे शौर्य व दक्षता हे तर आहे च, पण त्यांचे पायदळ व नामांकित तोफखाना ही हि मुख्य कारणे होती. जीव धोक्यांत घालण्याच्या सर्व प्रसंगांत श्रीमंत जातीने सर्वांच्या पुढे असत, मोर्ध्यात रात्रंदिवस रहात व सुरुंग खादण्याच्या वेळी ते स्वतः हजर रहात. रेझा निसटल्यावर मल्हाररावांनी कोल्हार परगण्यांतील तमाम ठाणी हस्तगत केली आणि कोल्हारचा किल्ला हि घेतला. या वेळी श्रीमंत वेंगरुळापर्यंत गेले होते, परंतु हैदरचे सैन्य नजीक असल्याची बातमी लागल्यामुळे, त्यावर झडप घालण्यास मिळावी या साठी ते सपाट्याने परत फिरले, पण त्या धूर्तानें तो यांचा डाव ओळखून भयाने श्ररिंगपट्टणास पळ काढला. या वेळी पावसाळा नजीक आल्याने श्रीमंतांनी त्याचा पाठलाग व केला नाही. हैदर पळाल्यानंतर गोपाळराव पटवर्धन रिकामे झाले, तेव्हां श्रीमंतांनी त्यांना निजगल्लच्या किल्लयास वेढा घालण्यास सांगितले. त्याप्रमाणे शके १६९२ चैत्र वद्य षष्ठीस गोपाळरावांनी त्या किल्यास वेढा घातला. ते स्थळ निसर्गतः मजबूत असून आंत शिबंदी चांगली असल्या मुळे ते लवकर हाती येईना; सवव आपल्या पायदळ व तोफखान्यानिशी खुद्द श्रीमंताची स्वारी पटवर्धनांचे मदतीस आली. मराठ्यांनी पानशांच्या करवीं तोफा लावून निकराचा हल्ला केल्यावर तो किल्ला वैशाख शुद्ध पंचमीच्या दिवशी ताब्यांत आला. किल्यावर हल्ले होत असतां एके दिवशी श्रीमंत माधवराव साहेव व नारायणराव साहेव हे तो हल्ला पहात उभे होते, त्या वेळी नारायणराव यांना गोळीची हलकीशी जखम झाली अशी नोंद आढळते. खरे यांच्या ऐ. ले. संग्रहांत या जखमेसंबंधाने जी हकिगत दिली आहे तींत * श्रीमंत राजश्री रावसाहेब हल्लयाचे वेळी उभे होते, त्यांचे पाठीमागे श्रीमंत राजश्री नारायणरावसाहेब उभे होते. त्यांचे उजवे हाताचे मनगटावर गोळी चाटून गेली. हलकी (जखम ) आहे' (पृ. १६१९ ) इतकाच मजकूर आहे. त्या वरून असा बोध होतो की, सदरची गोळी शत्रुपक्षांकडील असावी. पण भिवराव पानसे यांनी घरी पाठविलेले एक पत्र ( परिशिष्ट क्रमांक १० पहा ) मिळाले आहे. सदरचे पत्र निजगलचा किल्ला घेतल्यानंतर सतरा दिवसांनी लिहिलेले आहे. पत्रांत स्पष्ट म्हटले आहे की “राम तोफ फुटून श्रीमंत नारायणराव यांचे हातास चाटती गोळी लागली. या वरून पेशव्याकडील च राम तोफ डागली जात असतां फुटली व धाकट्या श्रीमंतांस जखम झाली. ही माहिती नवीन आहे. याशिवाय या पत्रांत जी माहिती आली आहे, तिच्याशी खरे यांच्या ऐतिहासिक लेखसंग्रह खंड भाग चवथ्यांतील माहितीचा उत्तम मेळ बसतो. निजगळचा * किल्ला तोफांशिवाय हस्तगत व्हावयाचा नाहीं” असे गोपाळराव पटवर्धन म्हणत होते ( ऐ. ले. सं. पृ. १६०९ ). “ तोफांचे सामान चांगले असावे अशी त्यांची श्रीमंताकडे मागणी होती, (कित्ता १६१२). “ तोफा चांगल्या असाव्या, त्यांत आनंदराव ( कृष्णराव ) माधव