पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण चौथे. ४. पानशांनी मिळावलेलीं कांहीं इनामें व जमिनी. शके १६८१ च्या सुमारास कृष्णाजी माधवराव व भिवराव यशवतराव पानसे यांनीं मौजे सावरदरी येथील निम्मे मोकदमी म्हणजे पाटिलकी विकत घेतली, त पेशवे सरकारांनीं शके १६८८ मध्ये करार करून दिली. ही निम्मे पाटिलकी अजून ‘पर्यंत पानसे यांचे घराण्यांत चालत आहे. | रामाजी परशुराम पानसे हे शके १६२५ च्या सुमारास होऊन गेले. त्यांना विसाजी व कृष्णाजी नांवांचे दोन बंधु होते. त्यांत रामाजीच्या शाखेत रंगोपंत झाले. त्यांना रामाजी याच नांवाचा एक मुलगा होता. हे रामाजी रंगो, शाहू महाराजांच्या कारकीर्दीमध्ये सातारा येथे राजदरबारांत सभासद या अधिकारावर होते. सभासदाचें काम म्हणजे, राज्यकारभारप्रसंगी विशेषतः न्यायनिवाड्याच्या वेळी राजास सल्लामसलत देणे हे असे; म्हणजे हल्लांच्या प्रांतिक किंवा वरिष्ठ कायदेमंडळांतील कार्यकारी मंत्र्या ( एक्झिक्युटिव्ह कौन्सिलर ) सारखे असे. रामाजीपंतास या कामाबद्दल सालिना साडे तीनशें होनांची तैनात होती. शाहु छत्रपतींच्या पश्चात् मराठी साम्राज्याचा राज्यकारभार साता-याहून पुण्यास पेशवे सरकाराकडे आला, त्या वेळी या सभासदांच्या सातायांतील नागा कमी करण्यांत आल्या. त्यामुळे रामाजीपंताची जागा व अर्थात् वेतन ही या वेळी बंद झाले, तसेच त्या जागेसाठी म्हणून जी कांहीं जमीन त्यांना मिळाली होती, ती हि परत सरकार जमा झाली. पुढे, त्यांच्या चिरंजीवांनी म्हणजे विठ्ठल रामाजी यांनी या अन्यायाबद्दल पुष्कळ तक्रारी केल्या; त्यावरून, सरकाराने विठ्ठल पंतास किल्ले वंदन येथे असामी दिली, पण पुढे शके १६८८ (श्रावण) मध्यें वंदनगड येथील सदरची असामी, श्रीमंत थोरले माधवराव साहेब पेशवे यांच्या आज्ञेने सखाराम बापू बोकील यांच्या दिमतीस सदर किल्ला दिल्यामुळे त्यांच्या कडे गेली. त्यासाठी विठ्ठल पतास मौजे कालंदबाडी परगणे निंब येथे बरीचशी जमीन वंदनगडच्या खर्चाकडे लावून दिलेली होती त्यांतून पंधरा विघे जमीन असामी ऐवजी म्हणून सरकाराने दिली व ती हि त्यास पुरेना म्हणून आणखी दहा बिघे जमीन त्याच गांवांपैकी दिली. त्या शिवाय शके १६८९ मध्यें किकवी येथे आणखी चार बिघे जमीन विठ्ठलपंतास दिली, या प्रमाणे असामी ऐवजी पंचवीस विघे जमीन घेऊन विठ्ठलपंत घरी बसले. त्यावेळी प्रत्येक गडाच्या आसपासच्या चार पांच कोसांच्या टापूंतील जामनी या त्या गडाच्या एकंदर खर्चासाठी म्हणून तोडून देण्याची वहिवाट असे. या लहानशा टापूस त्या त्या गडाचा • घेरा' असे नांव असे. हल्लीं सुद्धां, सिंहगडच्या आसपासच्या टापूस • सिंहगड घेराम्हणून नांव पुण्याच्या कलेक्टर हपसिांतल रेकार्डात नमूद आहे.