पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४८ पानसे घराण्याचा इतिहास. वरील जमिनीवद्दलचे एकंदर कागदांपैकी दोन कागद सखाराम भगवंत यांच्या नांवचे व एक कागद किकवींच्या मुकदम यांच्या नांवचा आहे ( परिशिष्ट क्रमांक ७-८-९). ले जमीन इंग्रजी अंमलापर्यंत पानशांकडे इनाम म्हणून चालू होती; इंग्रजी अंमल झाल्यानंतर शके १७७७ च्या ( इ. स. १८५५ ) सुमारास त्या जमिनीवर निमजुडी बसविण्यात आली. सदरची जमीन. अद्यापपर्यंत विठ्ठल पंताचे वंशजाकडे चालू आहे. | विठ्ठलपंतास रंगोवा या नांवाचे भाऊ असून, रंगोपंतास विष्णुपंत ऊर्फ रावजी या नांवाचा मुलगा होता. साता-यास प्रतापसिंह महाराजांच्या कारकीर्दीत हे रावजी खाजगीकडे नौकर होते. पुढे राजद्रोहाचे आरोपावरून इंग्रज सरकारांनी महाराजांची उचलबांगडी करून त्यांना काशीस नेऊन ठेविलें. मागें सातायास या राजद्रोहाचे कटांत जी मंडळी होती, त्यांची धरपकड सुरू झाली. या कामी आपल्यावर हि कांहीं बालंट येईल, या भीतीने रावजींनी पांचवड गांव बाळाजीपंत नातू यांची गांठ घेतली; व त्यांचे मार्फतीने इंग्रज अधिका-याची भेट घेऊन, या कटाशी आपला बिलकूल संबंध नाहीं अशी त्याची त्यांनी खात्री केली. त्या अधिका-याने तुमचें नांव अद्याप आमचे चौकशीत निष्पन्न झाले नाहीं सवव काळजी करू नये असे सांगितले. पुढे रावजी हे। दिवे येथे आपले घरी येऊन राहिले. महाराजांच्या विरुद्ध त्यावेळी, असलेली मंडळी आपल्यास या कटांत गोंवतील अशी धास्ती रात्रंदिवस रावजी यास असल्यामुळे ते दिवें गांव सोडून आपले वतनाचे, शिरवळ प्रांत असलेल्या, लोणी गांवीं रहाण्यास गेले व तेथे घरशेती करून त्यांनी कायमची वस्ती केली. त्या वेळेपासून त्यांचे वंशज तेथेच कायमचे नांदू लागले. ५. दक्षिणेतील खळबळ. यानंतर म्हणजे शके १६९१ मध्ये पेशवे सरकारची कर्नाटकांत हैदरअल्लीवर तिसरी स्वारी झाली. या स्वारींत श्रीमंत थोरले माधवरावसाहेब यांनी हैदरअल्लीस गलेंच नमविले. वास्तविक हैदर म्हणजे एक विलक्षण अकलेचा सेनापति होता. त्याची लढण्याची तन्हा एकच नव्हती. त्याने थेट मद्रासेवर चढाई करून मद्रासकर इंग्रजांची नुकती च पुरी खोड मोडली होती. या प्रमाणे त्याच्या मागचा इंग्रजांचा वेध कमी झाल्यानंतर त्याने मराठी राज्यास उपद्रव देण्यास प्रारंभ केला. दोन वर्षांपूर्वी पेशव्यांनी त्याच्यापासून बाळापूर, शिरे वगैरे जितका मुलुख घेतला होता, तितका सुर्व परत घेण्याच्या उद्योगास आतां त्याने आरंभ केला. तसेच कर्नाटकांत पेशवे सरकारची जी, चित्रदुर्ग, हरपनहल्ली वगैरे संस्थाने होती त्यांस, त्याने उपद्रव दिला; त्यांच्यापासून जबरदस्तीने खंडणी घेतली व तुंगभद्रा उतरून मराठी राज्यांत धुमाकूळ घालण्यास त्याने सुरुवात केली. त्याला अद्यापि श्रीमंत थोरले माधवरावसाहेबांचा दरारा, मुत्सद्दीपणा व सेनापतित्व यांची पुरी जाणीव झाली नव्हती. वास्तविक