पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४६ पानसे घराण्याचा इतिहास. जाळला गेला आणि तोफखानाहि लुटला गेला. हिवरे व सासवड ही दोन्ही गांवे याच वेळीं शत्रूने जाळली. | सुमारे पन्नास वर्षांपूर्वी, आमच्या लहानपणी, पानसे घराण्यांतील, एक वृद्ध वाई या प्रसंगाची हकिकत अशी सांगत असे की, सासवड व हिवरें हीं गांवें निझामाच्या सैनिकांनी प्रथम लुटून जाळून फस्त केल्यावर मग शत्रूचा मोर्चा सोनोरी गांवाकडे वळला. पानसे मंडळींतील सर्व कर्ते पुरुष या वेळीं हैद्राबादेकडे मोहिमेवर असल्यामुळे शत्रुसैन्याचा प्रतिकार करण्यास गांवीं पुरुष मंडळी कोणी नव्हती. निझामाच्या सैन्यांपैकी जो सरदार गांवें जाळण्याच्या मोहिमेवर होता तो पानशांचा लेफवळा होता. तो जेव्हां सोनोरीवर, चाल करून आला तेव्हां पानशांच्या घरांतील बायकांनी त्यास ओळखून जवळ बोलावून घेतले व सांगितले की, तू आमच्या अन्नावर पोसलेला असून आतां असा बेइमानी का झालास ? हे त्यांचे मार्मिक शब्द ऐकून तो सरदार खजील झाला व लुटालूट वगैरे कांहीं न करता तसाच परत गेला. पूर्वीच्या काळी शत्रूच्या गोटांत असलेल्या सज्जन वीरांत हि कांहीं प्रसंगी सदसद्विचारांची ज्योत अंतःकरणांत जागृत होत असे; असे यावरून दिसून येते. वरील कथेत बरेंच सत्य दिसतें सबब ती येथे मुद्दाम दिली आहे. या सुमारास पर्जन्यकाळ जवळ आल्यामुळे निझाम आपल्या राज्याकडे परत वळला. या त्याच्या मागे फिरण्याला या खेरीज दुसरें हि एक कारण होते; ते म्हणजे तो पुण्याकडे आल्यानंतर त्याच्या राज्यांत त्यास पायबंद बसावा म्हणून दादासाहेबांनी केलेली खारी हे होय. ही खारी थेट हैद्राबादेपर्यंत झाली व तिकडे दादासाहेबांनी आपला दरारा इतका बसविला कीं, निझामाला तावडताव मागे वळणे भाग पडले. निझामाची स्वारी हैद्राबादेकडे परत जात असतां गंगेस पूर आल्यामुळे औरंगाबादेजवळच्या राक्षसभुवन नांवाच्या गांवीं तो मुक्कामास राहिला. ही बातमी समजतां च दादासाहेब त्याच्या वर चालून गेले. दोघांत वीस कोसांचे अंतर होते, व दोघांच्या मध्यें जानोजी भोसले हे फौजेसह रोख धरून बसले होते. त्यांच्या दहशतीने निझामानें गंगापार होण्याचा बेत केला आणि तो स्वतः रात्रीं कांहीं सैन्यानिशी पलीकडे गेला. इतक्यांत दादासाहेब आपल्या फौजेनिशी व भिवराव पानसे आपल्या तोफखान्यासुद्धा एकदम निझामाच्या बाकी राहिलेल्या फौजे वर घसरले. या वेळीं भयंकर युद्ध होऊन खासा विठ्ठल सुंदर यास तोफेचा गोळा लागून तो ठार झाला; तसें च विनायकदास हि कामास आला. चकमकीत मुरादखान याला जिवंत पकडण्यांत आले. याप्रमाणे या युद्धांत भिवराव पानसे यांनी आपल्या तोफखान्याची कामगिरी उत्तम त-हेनें क्जाविली व पेशव्यांस जंयं मिळाला. ही लढाई शके १६८५ श्रावशांत झाली.