पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण चौथे. ४५. निझामाने आपल्या मुख्य दिवाणाची जागा देऊन “राजे प्रतापवंत” ही पदवीहि दिली होती. यावेळी निझामअल्ली, विनायकदास, मुरादखान वगैरे मंडळीच्या मनांत पेशव्यांवर स्वारी करण्याचे या विठ्ठलपंताने भरविलें. ।

  • गनिमाच्या राज्यांत फूट आहे. राघोबा व माधवराव यांचा आपसांत बेबनाव आहे. ऐशियांत स्वारी करून गनीम मोडून आपला अंमल बसवावा." असा मनसुबा ठरून विठ्ठल पंताची नेमणूक ही कामगिरी पार पाडण्याकडे झाली. पेशव्यांचे पेशवेपद आपल्याकडे घेण्याची हि महत्त्वाकांक्षा पंतानें वाळगिली होती. या वेळी पेशव्यां--- कडील कांहीं (प्रतिनिधि, घाटगे, घोरपडे, पवार, निंबाळकर वगैरे ) रुष्ट सरदार हि आंतून पंतास मिळाले होते. ही जोड ह्या संधीस लाभल्यामुळे त्यास चांगले उत्तेजन मिळाले. वर सांगितल्या प्रमाणे उत्तरेत मुसलमानांनी धुमाकूळ चालविला होता, तर दक्षिणेत हि हैदरने मराठी राज्यास त्रास देण्यास सुरवात केली होती. त्यामुळे हैदरच्या तोंडावर कांहीं फौज पाठविणे पेशव्यांना भाग होते. ही वेळ साधून विठ्ठलपंताने आपल्या सैन्याचे चार भाग करून, तो पुण्याच्या रोखाने कूच करीत निघाला; निघतांना त्याने उद्दामपणाने पेशव्यांना निरोप पाठविला की, “आपलेकडील जे सरदार आमच्याकडे येऊन मिळाले आहेत, त्यांचे प्रांत, किल्ले वगैरे जें कांहीं तुम्ही जप्त केले आहे ते सर्व त्यांचे त्यांस परत द्यावे व आम्ही जो कोणी कारभारी नेमू त्याच्या सल्लयाने तुम्ही राज्यकारभार चालवावा.” हा निरोप रघुनाथराव दादासाहेब यांस कळला त्यावेळी त्यांना फार राग आला. त्यांनी गृहकलह तात्पुरता बंद ठेवून निझामास तोंड देण्याची तयारी केली. राज्यांतील एकंदर फौज इतस्ततः पांगलेली असून आपलेकडील कांहीं सरदार प्रतिपक्षास फितुर झालेले आहेत अशा स्थितीत निझामास प्रत्यक्ष समोरासमोर तोंड देणे बरे नव्हे. यावेळी गनिमी काव्याने दाने डाव खेळावे हे बरें; असे ठरले. प्रथम त्याच्या राज्यांत धुमाकूळ घालून त्याला प्रारंभींच पायबंद द्यावा असे, सखारामबापू, नारो शंकर, विंचूरकर, पुरंदरे, पानसे इत्यादि मुत्सद्यांच्या विचाराने दादासाहेबांनी ठरविले; आणि त्या प्रमाणे व्यवस्था करण्यास

सुरुवात झाली. इकडे निझाम धारूरा वरून पुण्याकडे वळला. त्याने वाटेवरील पेशव्यांचा प्रांत लुटून जाळून पोळून फस्त केला. नंतर तळेगांवावरून त्याचे सैन्य थेट पुण्यावर चालून आळे. परंतु पुण्याच्या लोकांस सरकाराने अगाऊ सूचना दिलेली असल्यामुळे गांव साधारणतः अगोदरच उजाड झालेले होते. निझामाच्या सरदारांनीं गांवास आग लावून व इतर अनेक प्रकारे त्रास देऊन गांवक-यांचा अनन्वित छळ केला. जे सरदार प्रामाणिकपणे पेशव्यांस चिकटून राहिले त्यांचे पुण्यातील राहते वाडे व पुण्यानजीकची गांवे लुटून त्यांस त्यांनी आगी लावून दिल्या. याचवेळी पुण्यांतलि पानशांचा वाडी