-४४ पानसे घराण्याचा इतिहास. आल्यावर लवकर च वारले. त्यांची तोंडावरील जखम बरी व्हावी म्हणून पुष्कळ खटपट करण्यांत आली, परंतु या खटपटीस यश आले नाही. अखेर या दुखण्यांत च त्यांचा अंत झाला. यांच्या स्त्रीचे नांव मैनाबाई असे होते. | तिकडे पानपत-प्रकरण चालू असतां इकडे शके १६८२ सालीं श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी मौजे खामगांव ( टेक ) येथे अ चाहूर जमीन पानझांस इनाम दिली (परिशिष्ट क्रमांक ६ पहा ). | ही जमीन पूर्वीचे माधवराव शिवदेव यास इनाम देण्याचे ठरले होते, पण राजपत्र होण्यापूर्वी ते वारल्याने कृष्णराव वगैरे बंधूच्या नांवें या वेळी पेशव्याकडून इनाम पढ़ें करून देण्यांत आली. ३. निझामावरील स्वारींत भिवराव, . मागे सांगितल्या प्रमाणे पानपतचा धक्का बसल्याने श्रीमंत नाना साहेव पेशवे यांनी आपला अवतार संपविला. त्या नंतर श्रीमंत माधवराव साहेव यांची पेशवाईच्या गादीवर स्थापना झाली. परंतु, त्या वेळी श्रीमंतांचे बय लहान असल्याने रघुनाथराव दादासाहेब हेच कारभार पहात असत. आरंभीं जरी चुलत्यापुतण्यांत एक विचाराने राज्यकारभार चालविण्याचे ठरून त्या प्रमाणे वागणूक होती तरी पुढे कांहीं दिवसांनी त्या ठरावांत बिघाड झाला आणि दादासाहेब हे माधवरावापासून फटकून बाहेर निघाले. या प्रमाणे पेशव्यांचे घरांत दुफळी होऊन भाऊबंदकी -माजली; शिवाय, पानपताच्या युद्धामुळे त्यांच्या सैन्याचा हि जोर कमी झाला होता. अर्थात् या नाजूक परिस्थितीचा फायदा या वेळी घेण्याचे पेशव्यांच्या शत्रूनी ठरविले, यांत कांहीं नवल नाहीं. उत्तरेत मुसलमानांनी त्यांच्या विरुद्ध काहूर उठविलेंच होते. त्यांत भर घालण्यासाठी दक्षिणेत हि निझामाने पुन्हा कारवाई सुरू केली. ... या वेळी विठ्ठल सुंदर हे निझामाचे दिवाण होते. साडेतीन शहाण्यांपैकी हे एक होत. त्यांच्या मनांत या संघीचा फायदा घेऊन पेशव्यांचे पारिपत्य करावे असे आले. विठ्ठलपंत हा हिंदु असून त्याला * हिंदवी राज्य बुडविण्याची खटपट करण्यास कांहीं दिक्कत वाटली नाही. या वरून त्या काळीं एकराष्ट्रीयत्वाची, एकधर्मभावनेची अथवा एकजातीयत्वाची भावना राष्ट्रांतील कर्तबगार पुरुषांत व मुत्सद्यांत कितपत वास करीत होती याच स्पष्ट कल्पना येईल. या भावनेच्या अभावामुळे किंवा अत्यल्प प्रमाणामुळेच त्या वेळी हिंदुस्थानची हानि इशाली; आणि त्या नंतरच्या काळांत किंबहुना प्रत्यक्ष आज हि ती भावना जितक्या उत्कटत्वानें वास करावयास हवी तितकी नसल्याने सांप्रतहि हिंदुस्थानची हानि होत आहे, हे आपल्या दृष्ठीपुढे आहेच. असो. ... विठ्ठल सुंदर हा यजुर्वेदी ब्राह्मण असून त्याने निझामची गादी राखण्यांत अतिशय खटपट केली होती. या मुळे त्याच्यावर निझामाची फार मर्जी बसलेली होती; त्यास
पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/80
Appearance