पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण चौ. ४३ या मंडळींत होते. दामोदरराव गणेश पानसे यांच्या कैफियतींत महिपतराव यांचा उल्लेख या पानपत प्रकरणांत आला आहे. त्यास दुसरी कडे हि आधार सांपडतो. शालिग्राम यांनी प्रसिद्ध केलेल्या ऐतिहासिक पोवाड्यांत पानपतच्या मोहिमेचे तीन पोवाडे छापले आहेत; त्यांपैकी सटवा रामा नांवाच्या शाहिरानें जो पोवाडा केला आहे, त्या पोवाड्यांत महिपतराव पानसे यांचे नांवाचा उल्लेख आला आहे. भाऊसाहेबांच्या बरोबर जी फौज पानपतास गेली तिच्या वर्णनांतः–

  • धाकले नाना कुळक्षरी त्यांच्या मोहरले फुल शहर। महिपतराव ते हि पानसे तोफखान्याचे सरदार ॥" असा महिपतरावांचा उल्लेख आहे.

शके १६८२ पौष शुद्ध अष्टमी बुधवार या दिवशी पानपतावरील रणकंदन झालें आणि “ श्रीहरी त्या अमित्रा ( अब्दाली ) कडील फौजेस संन्मुख जाहला, श्री. पेशवे बहाद्दर यांस विन्मुख जाहला याजमुळे सर्व नाश जाहला (पाणिपत बखर पान ४५). या महायुद्धाचा मराठी साम्राज्यास जबर धक्का बसला. सगनभाऊ म्हणतो की, * नवलाख बांगडी ( या युद्धांत ) फुटली असा हाहाकार । दक्षिण बुडाली सती पडल्या महामूर ॥” त्यांत आणखी श्रीमंत नानासाहेब पेशवे याच वेळीं वारले व त्यामुळे मराठी साम्राज्यावर मोठे च संकट कोसळले. ही परिस्थति पाहून मराठ्यांच्या शत्रूस वाटले की, “ आतां सज्जनगडच्या गोसाव्याचे भगवे निशाण फाटलें व भिमथडीच्या तट्टांची धांव गंगथडीच्या अलीकडेच खुटली.” पण अद्यापि शिवाजीमहाराजांनी स्थापिलेल्या “ हिंदवी राज्या” वर प्रभु रामचंद्राची कृपादृष्टि होती, म्हणून थोड्याच दिवसांत श्रीमंत थोरले माधवरावसाहेब यांनी पानपतची विसकटलेली घडी पुनश्च बसविली; असो. पानपतच्या युद्धांत ज्या वेळी मराठ्यांच्या सैन्याची दाणादाण होऊन ते वाट सांपडेल तिकडे पळत सुटले त्या वेळी एक पठाण सरदार महिपतराव पानसे यांचा पाठलाग करू लागला. पठाणानें पानशांस गांठलें; दोघांची बरीच झटापट झाली, तींत महिपतराव यांनी त्या पठाण सरदारास अखेर अल्लाचें घर दाखविले. या झटापटींत महिपतराव यांचे तोंडावर तरवारीचा एक जोराचा वार लागला. पानपताहून जी सरदार मंडळी व इतर फौज परत देशी आली, त्यांत महिपतराव हे हि परत आले. महिपतरावांची नेमणूक पानपतच्या युद्धापूर्वीपासून तोफखान्याकडे च होती. यांच्या शिवाय आणीक हि पानशांपैकी काही मंडळी पानपतावर गेली होती. त्यांचा नक्की शोध असन लागत नाही. तत्रापि, रामाजी परशुराम पानसे यांच्या शाखेतील सदाशिवपंत हे पानपतास गेल्याचा व तेथे गारद झाल्याचा उल्लेख कागदोपत्रीं आढळतो. | या सदाशिवपंताच्या वडिलांचे नांव निळोबा असून निळोबाच्या बापाचें नांव विट्ठलपंत असे होते; आणि हे विठ्ठलपंत रामाजी परशुराम यांचे नातू होत. सदा-- शिवपंतास संतति न झाल्यामुळे त्या शाखेचे पुढे नक्कल झाले. महिपतराव इकडे