पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुरस्कार, पानसे ( पानसी ) घराणे फार इतिहासप्रसिद्ध आहे. विशेषेकरून आम्हां मराठ्यांत तोफखान्याचे अंग तितकें मजबूत नव्हते; एरवीं वसईच्या युद्धप्रसंग चिमाजी अप्पांनी व इतर अनेक प्रसंगी इतरांनी हि ‘फिरंगी प्रत्यक्ष आगीचा पुतळा होता' असे भयसूचक आश्चर्याचे उद्गार काढलेच नसते. बाबर चगताई हा तोफखान्याच्या बळावरच पानिपत व कनवा येथे हिंदुमुसलमान शत्रूना चोपून ‘ फत्तेच्या मसनदी' वर बसला ! उस्ताद अली कुली व मुस्तफा हे त्याचे अधिकारी या शतम्निव्यापारांत प्रवीण होते. पुढे दक्षिणेत हुसेन निजामशहा वगैरे मंडळीजवळ या भांड्यांचा पोख्त सरंजाम असे. विजापुरास लांडा कसब किंवा मुलुख-इ-मैदान इत्यादि प्रचंड तोफा अजून हि पड-- लेल्या दिसतात. त्यावरून तोफांचा प्रचार दाक्षिणेत हि चांगला च होता असे दिसते. परंतु पुढे मराठी राज्यांत तोफांचे प्राबल्य प्रारंभी तरी विशेष दिसत नाही. आरमाराचे खात्यांत काय प्रकार असेल तो असो, परंतु फौजी खात्यांत तरी निदान थोरल्या बाजीराव साहेबांच्या वेळीं पुण्यांत तोफा ओतत असले तरी या कामांत वरचढपणा कांहीं मराठ्यांकडे नव्हता. पुढे पुढे तोफखाना अधिक सजावणे अवश्य पडून भाऊसाहेबांचे वेळेपासून मोगली पद्धतीकडे त्यांचा कल झुकत गेल्यामुळे तोफांचा आरावा बांधणे, गोल चालविणे इत्यादिक बाबींना मराठी लष्करांत महत्त्व आलें. तथापि या खात्याची ‘ उस्तादी' खास मराठे मंडळांत नव्हती. पानसे घराण्याची मोठी कामगिरी म्हणजे या नव्या खात्यांत त्यांनी नांव कमाविलें ही होय. | पानशांच्या या बहुमोल कामगिरीचा वृत्तांत एकत्र व संकलित असा तयार होणे अत्यवश्य आहे. परंतु इतिहासाकडे समाजाचे लक्ष्य जावे तितकें अजून हि गेलेले नाहीं. मात्र हळु हळु जागृति होत आहे आणि त्याचाच एक नवा पुरावा म्हणजे हा पानसे घराण्याच्या इतिहासाचा ग्रंथ होय. हा ग्रंथ रावबहादुर केशवराव पानसे यांनी लिहिलेला आहे. रावबहादुर केशवराव यांनी खरोखरच आपल्या घराण्याची अमोल सेवा या पुस्तकाचे द्वारा केली आहे. ग्रंथलेखन किंवा इतिहास हा कांहीं रावबहादुरांचा विषय नव्हे. त्यांचा सर्व जन्म गेला बांधकाम-खात्यांत. परंतु स्वतःच्या कुळाविषयीं खरी कळकळ त्यांचे ठिकाणी विशेष असल्यामुळे त्यांनी हें कुलेतिहासरचनेचे दगदगीचे परतु उपयोगाचे काम हाती घेऊन फार चांगल्या प्रकारे तडीस नेले हे त्यांस खरोखर फार भूषणावह आहे. | पानसे मंडळी दूरवर पसरलेली, त्यांच्या सर्व शाखांचा जेवढा इतिहास कागदपत्रांच्या साहाय्याने जुळवितां आला तेवढा च आप्पासाहेब यांनी या ग्रंथांत जुळवून मांडला आहे. घराण्याचे कामगिरीचे मानाने मिळालेली माहिती पुष्कळ त्रुटित आहे, याला इलाज नाही. याचं कारणांमुळे ग्रंथांतील प्रकरणांस हि कोठे कोठें त्रुटित किंवा