पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४२ पानसे घराण्याचा इतिहास. दादासाहेव यांचा स्वभाव होय असे कांहीं इतिहासज्ञांचे म्हणणे आहे; तर दुस-या कांहीं इतिहासज्ञांचे असे मत आहे की, दादासाहेबांकडे फारसा दोष नसून त्या वेळीं उत्तरेत असलेले मराठी साम्राज्याचे जे सरदार यांच्यांतच एकराष्ट्रीयत्वाची असावी तितकीं जाणीव नव्हती. असा हा विद्वानांतील मतभेद आहे. आम्हांला त्यांत निर्णय देण्याचा अधिकार नाही; पण, आमच्या अल्प मतीस असे वाटते की, वरील दोन्ही पक्षांच्या म्हणण्यांत, कोणाहि एकाच पक्षाचे म्हणणे नितांत सत्य नाहीं. दोघांच्या हि म्हणण्यांत थोडा फार सत्याचा अंश आहे. या सुमारास दादासाहेब वयाने तरुण असल्याने त्या वयांत आढळणारे विवेकापेक्षां विकारप्राबल्य यांच्या हि ठायीं अधिक होते. त्या प्रावल्यास युक्तीने दाबणारे मुत्सद्दी सरदार या वेळी उत्तरेत अगदी च नव्हते असे नाहीं; पण जे कोणी होते त्यांच्यांत एकराष्ट्रीयत्वाची भावना असावी तितकी प्रखर नव्हती. त्यांची दृष्टि मराठी साम्राज्याच्या चिरकालिक कल्याणापेक्षा आपल्या फायद्याकडे वाजवीपेक्षा जास्त होती. या सरदारांत शिंदे घराणे मात्र मध्यवर्ति सरकारच्या नफ्यातोट्याकडे आपल्या स्वार्थीपेक्षां अधिक लक्ष घाली. यामुळे उत्तरेत परक्या शत्रूशी एकमुखाने किंवा एक जुटीने तोंड देण्यास किंवा आपला राज्यकारभार भक्कम पायावर स्थापण्यास पेशव्यांना सवड मिळाली नाहीं. दादासाहेबांच्या अपयशाचे व त्यांनतरच्या पानपताच्या हि अपयशाचे ( अनेक कारणांपैकीं ) हे एक कारण होते; असो. २. पानिपतचे युद्ध व महिपतराव पानसे. पानिपतप्रकरण उदगीरनंतर उद्भवलें, किंबहुना त्याचा आरंभ तत्पूर्वी एक दोन वर्षे झाला होता. अवदाल्लीचा कायमचा निकाल लावून दिल्लीवर आपला कायमचा शह ठेवणे जरूर होते. दिल्लीहून पातशहाचे हि पेशव्यांना बोलावणे आले होते. नुक्ताच भाऊसाहेबांनी निजामावर जय मिळविला होता व दादासाहेब उत्तरेकडून आले ते विशेष फायदा न करता आले होते, त्या मुळे श्रीमंतांनी अखेरीस भाऊसाहेबांना च मोहिमेवर पाठविण्याचे निश्चित केले. मोंगलाईतील सिंदखेड ( जाधवरावांचे जहागिरीचें गांव ) नजीक पूर्णा नदीचे कांठीं पटदूर म्हणून एक गांव आहे; तेथे श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी शके १६८१ च्या रंगपंचमीस दरबार भरवून वरील योजना निश्चित केली. त्या नंतर सात दिवसांनी ( वद्य एकादशीस ) भाऊसाहेब हे आपल्या सैन्यानिशी उत्तरेकडे निघाले. ज्या तिथीस हे कुच सुरू झाले, त्या तिथीनंतर जवळ जवळ दहा महिन्यांनी पानपताच्या युद्धाचा शेवट होऊन श्रीमंत भाऊसाहेब हे रणभूमीवर गारद झाले ! पानपतच्या युद्धाची माहिती मराठी इतिहासाच्या बहुश्रुत वाचकांस साधारणतः ठाऊक आहेच. त्यामुळे याची तपशीलवार माहिती येथे देण्याची अवश्यकता नाहीं. पटदुराहून निघतांना भाऊसाहेबांबरोबर जवळ जवळ पन्नास हजार फौज व बळवंतवि मेहेंदळे, नाना पुरंदरे, माहिपतराव चिटणवीस, लक्ष्मण बल्लाळ, भवानी शंकर, इब्राहीमखान वगैरे सरदार मंडळी होती. पानशांपैकीं महिपतराव लक्ष्मण हे हि