पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

। प्रकरण चौथे. -- . ... भिवराव यशवंत व त्यांचे बंधु.। माधवराव शिवदेव वारल्यानंतर, तोफखान्याची मुख्य सरदारकी त्यांचे पुत्र कृष्णराव यांस सरकारांतून मिळाली; त्या बरोबरच फौजेच्या सरदारीची वस्त्रे भिवराव यशवंतराव यांस मिळाली. या पुढे, कृष्णराव माधव यांच्यापेक्षां । भिवराव यशवंत व त्यांचे बंधु, त्यांतल्या त्यांत जयवंतराव च सखारामपंत यांची कामगिरी तत्कालीन इतिहासांत जास्त महत्त्वाची झालेली आढळते. त्यामुळे त्यांची माहिती येथे प्रामुख्याने देत आहों; अर्थात् तदनुषंगाने कृष्णराव माधवराव व इतर पानसे मंडळी यांचीहि माहिती येईलच. कृष्णराव यांस जो तोफखान्याच्या दरोग्याचा सरंजाम मिळाला तो वडिलापेक्षा थोडासा ज्यास्त होता. माधवराव यांस त्यांच्या कारकीर्दीच्या अखेरीस ८८४५ रुपयांची तैनात होती असे मागे सांगितले आहे. त्यांच्या मृत्यूनंतर दुस-या वर्षी म्हणजे शके १६७८ मध्ये कृष्णराव यांस जी तैनात मिळाली तिचा आंकडा आमच्या जवळील तैनात जावत्यांत १०२०० रुपयांचा आढळतो. त्यानंतर दोन वर्षांनी त्यांची वढती होऊन १६६०० रुपयांची नेमणूक झाली. पुढे एक वर्षाने म्हणजे शके १६८१ च्या सुमारास नेमणुकीची रक्कम २१३४१ रुपयांची करण्यांत आली. त्यानंतर क्रमाक्रमाने तिची वाड पुढील प्रमाणे होत गेल्याचा दाखला मिळाला आहे. शके १६८७ मध्ये २३२४५. रुपये, शके १६९६ मध्ये ५०००० रुपये आणि शके १६९९ चे सुमारास ६७००० रुपये; यापैकी शके १६८१ च्या पौष शुद्ध नवमीच्या तैनात जाबत्यांत पोषाक ४०० रुपयांचा केला व बाकीच्या नख्त नेमणुकीबद्दल तितक्या वसुलाचीं गांवे त्यांस जहागीर दिली, असा उल्लेख आढळतो. याच कृष्णराव व भिवराव यांनी मौजे सावरदरी येथील निम्मे पाटिलकी वतन कणसे पाटील यांजपासून एक हजार रुपयांस । विकत घेतले. त्याचे राजपत्र शके १६८८ मध्ये श्रीमंत थोरले माधवराव साहेब पेशवे यांनी करार करून दिले. ( परिशिष्ट क्रमांक ५ पहा. ) उदगरि येथे श्रीमंत भाऊ साहेब पेशवे यांनी अपूर्व यश संपादन केले होते. तत्पूर्वी श्रीमंत रघुनाथराव दादा साहेब पेशवे यांनी उत्तर हिंदुस्थानांत एक दोन मोहिमा केल्या होत्या. आणि एका मोहिमेत तर भिमथडीच्या घोड्यांना अटकेचे पाणी पाजून व अटकेवर मराठी झेंडे फडकावून मराठ्यांना अपूर्व यश मिळवून दिले होते. हैं जरी सर्व खरे होते तरी राजकीय बंदोबस्त करणे व मराठ्यांची सत्ता उत्तरेत दृढमूल करून अबदाल्ली सारख्या परक्या शत्रूस आणि दिल्ली येथील मराठ्यांच्या विरुद्ध असलेल्या मुसलमानी पक्षास काबूत ठेवणे हे त्यांना साधलें नाहीं. याला कारण,