पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पानसे घराण्याचा इतिहास. जो ) हुजुरून पावतो, त्याची यादी अगर चिठ्ठी आकारून हुजूर लेहून देणे त्याचा करारः-( ती ) फडणीसांनी आकारून द्यावी. सरदारांनी व दिवाणांनी व मजमदारांनी पाहून...समजावून विल्हे लावून घ्यावी......कलम १ लोकांची कबजे ( पावत्या ) करावयाचा करारः-( ती ) फडणिसांनीं करावी (व) मजमदारांनी पाहून बिल्हे लावून घ्यावी..........कलम १ ८. पोत्याची चिट्ठी व कोठीची चिट्ठी ( व ) फडणविसांनीं लिहावें.. दिवाण व सरदार...व मजमदारांनी निशाण करावे. कीर्दीवर एकुणात मजमदारांनी करावी............कलम १ लोकांचा व रावत्यांचा तैनात जावता लिहिणे व हुजूरून करार करून घेणे, रद्-- बदल करणे, हे सर्व सरदारां समागमें दिवाण व मजमदार अगर सबनिसांनी आणावें. ( करावें ), हुजुरून मखलासी करून......फडणविसाजवळ द्यावी......कलम १ येणेप्रमाणे सात कलमें कारखान्याची करार करून दिल्ही असेत. सदरहू प्रमाणे वर्तणूक करणे, म्हणोन मशारनिल्हेचे ( माधवरावांच्या ) नांवें सनद. " ही सनद खमस खमसैन मया व अलफ, जमादिलावल ६०९ या दिवशी म्हणजे शके १६७६ फाल्गुन शुद्ध १० रोजी माधवराव यांस पेशवे सरकारांतून मिळाली. याप्रमाणे माधवरावांचा उत्तरोत्तर उत्कर्ष झाला. वसई, साष्टी वगैरे मोहिमांत पेशव्यांचे फौजेवरोवर माधवराव होते असे एका कैफियतींत लिहिले आहे ( दामोदरावे गणेश यांची कैफियत वाडकृत ). सावनूरकर नवाबावर श्रीमंत पेशवे यांनी शके १६७७ त जी मोहीम केली, तींत माधवराव होते आणि सावनूर ज्यावेळी पेशव्यांनी सर केले, त्या वेळच्या अरेतुरेच्या लढाईत माधवराव सरकारकामी आले. ही लढाई शके १६७७ फाल्गुन शुद्ध ११ रोजी झाली. या लढाईत, ज्या मुजफरखानाकडून माधवरावांनी शिक्षण घेतले त्याच खानाच्या तोंडास तोंड देण्याचा प्रसंग त्यांस आला. खानाच्या तनि चौक्या माधवरावांनी उधळून लावल्या व सव्वा लाख गोळे फेकून नबाबाचा किल्ला भाजून काढला व सावनूर काबीज केले. ( रा. खंड ३ ले. ४७२ त ४७७.) यावेळी मुझफरखान पळन गेला. त्याने नवावास फिरून तोंड दाखविले नाही. परंतु पेशव्यांकडे फिरून येऊन पानशांचे हातांखालीं तो तोफखान्यांत नौकर राहिला. या सावनूरचे लढाईत माधवरावांचे बंधु यशवंतराव हे हि होते. दोघे बंधु समरांगणा शत्रूशी लढत असतां माधवरावास गोळी लागून ते तत्काळ युद्धभूमीवर पतन पावले व यशवंतरावाचे पायास भाल्याची जबर जखम झाली. ही जखम पुढे बरा होण्यास बरेच दिवस लागले. या मर्दुमकीबद्दल यशवंतराव यांस अंबारी व साहेब नौबद असे पारितोषिक मिलाले. याप्रमाणे माधवराव शिवदेव तोफखान्याचे पहिले सरदार यांचा शेवट झाला. माधवराव यांच्या पत्नीचे नांव राऊबाई असे होते. त्यांना अखेरपर्यंत पुत्र न झाल्याने त्यांनी आपला पुतण्या ( यशवंतरावाचा मुलगा ) कृष्णराव यास दत्तक घेतले होते.