पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण तिसरे ३७ शके १६७५ मध्ये श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी माधवराव व त्यांचे चार बंधु यास मौजे सोनोरी येथे पंधरा विघे जमीन इनाम दिली ( परिशिष्ट क्रमांक ४ पहा). यावरून या वेळी हे सर्व बंधु एकत्र होते. यशवंतराव * यास मुख्य तोफखान्याची सरदारी मिळाली असे एके ठिकाणी लिहिकेले आढळते, पण, ते चुकीचे दिसते. कारण श्रीमंत बाळाजी बाजीराव पेशवे यांच्या रोजनिशींत तोफखान्याच्या कारभाराची जी सनद श्रीमंतांनी दिलेली आहे, ती माधवरावाच्या नांवाची आहे, यशवंतरावाच्या नाहीं. ( वाड. वा. बा. पे. रो. भा. १ पृष्ठ १८० ), तसेच इतिहासकार रा. गो. स. सरदेसाई यांनी वरील माहिती गृहित धरून माधवराव हे यशवंतरावाचे पुत्र होत असे जे आपल्या पुस्तकांत लिहिले आहे ( म. रि. म. वि. २ पृ. ३९४ ) ते अगदीं चूक आहे. माधवराव व यशवंतराव हे सख्खे भाऊ होते. त्यांत माधवराव हे वडील असून यशवंतराव धाकटे होत. - तोफखान्याच्या कारभाराची सरकारी सनद माधवराव यांस जी मिळाली, तिच्यांत तोफखान्यांत एकंदर व्यवस्था व कायदेकानु कोणत्या प्रकारचे असत ते दिले असल्याने, ती सनद पुढे देतो. । * माधवराव शिवदेव यांजकडील तोफखान्याचे कारभारास येणेप्रमाणे. राऊत वगैरे लोक नेहमी व निसबतीचे आहेत, त्यांचा रोजमुरा वांटावयाचा करार. दिवाण व मजमदार व फडणवीस व सबनीस यांनी बसोन वांटणी हातांवर द्यावी. वांटणी फडणविसांनी लिहावी......कलम १ | राऊत वगैरे लोक नेहमी (चे ) व निसबतीस (असलेले ) देखील (व ) काबडी यांची हजिरी घेणे. सरदार ( तोफखान्यावरील मुख्य सरदार ) व दिवाण व मजमदार व फडणवीस व सबनीस यांनी महिन्यांत एकं, दुसरी हजेरी घेणे ते घ्यावी. हजेरी लिहिणे व नेहमी हजेरी घेणे ते सबनिसांनी घ्यावी. अवघे बसोन हजेरी घेतील त्याजवर एकुणात ( एकूण संख्येचा शेरा ) मजमदारांनी करावी. तारीख फडणविसांनी करावी. ....कलम १ । . रोखा पत्र वगैरे हरएक लिहिणे, ते कोणी लिहावें वे हुजन सनदपत्र येईल तें कोणापाशीं विल्हे लावावी त्याचा करारः फडणविसांनी लिहावी, मजमदारांनी निशाण ( शेरा ) करावे. कागदपत्र फडणविसांजवळ ठेवीत जाणे......कलम १ नेहमी (चे ) व निसबतीचे लोक यांची अडिसरी (धान्य रूपाचा पगार ) व कामाठ्यांचा पीठ पैसा व उंटांच्या व बैलांच्या वगैरे चंदीचा दाणा व किरकोळ ( माल

  • दामोदरराव गणेश ( कैफियती वाडकृत ) यांचे कैफियतींत मुख्य सरदारी यशवंतराव यास मिळाली. परंतु त्याबद्दलची सनद त्यांनी आपले वडील बंधु माधवराव यांचे नांवची करून घेतली असा उल्लेख आहे.