पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण तिसरें. ३९ माधवरावाचे धाकटे बंधु यशवंतराव व महिपतराव यांना माधवरावांचे हाताखालीं सरदारी मिळाल्याचे मार्गे लिहिले च आहे. वसईचे युद्ध, डभईची मोहीम, महंमद बंगषवरील स्वारी, भोपाळची लढाई वगैरे युद्धांत यशवंतराव हे पेशवे सरकारच्या फौजेबरोबर होते. त्यांना पूर्वी तीनशें स्वारांची सरदारी होती, ती शके १६६० च्या नंतर पांच शें स्वारांची करण्यांत आली, म्हणजे यशवंतराव हे पांच शें घोडदळांचे पागे झाले. त्याच वेळी त्यांना ( स्वतः जातीस व फौजेस मिळून ) सरकारांतून सरंजामं करार करून देण्यांत आला. यशवंतराव हे नक्की कधी वारले, ती मिति मिळत नाही. त्यांच्या पत्नीचे नांव बहिणाबाई असे असून त्यांना भिवराव, जयवंतराव, सखारामपंत, विश्वासराव, पुरुषोत्तमराव व कृष्णराव असे सहा पुत्र झाले. पानशांचा अत्यंत भरभराटीचा 'काळ या सहा बंधूंच्या कारकीर्दीत च आला; त्यामुळे त्यांची हकीकत पुढे स्वतंत्र दिली आहे. । ५. केशवराव पानसे व उदगीरची लढाई. यशवंतरावांना केशवराव नांवाचे एक धाकटे भाऊ होते; ते हि पेशव्यांच्या फौजेबरोबर जात असत. गुजराथेत श्रीमंत राघोबा दादा पेशव्यांच्या ज्या मोहिमा शके १६०४ त झाल्या त्यांत केशवराव हजर होते. सदर मोहिमांत केशवरावांनी सरकारचाकरी बहुत पराक्रमाने केल्यामुळे, विरमगांव परगणा व दसकुरोई परगणा ( गुजराथ प्रांत ), या दोन परगण्यांतील मजमु व फडणिशी यांचे दरख श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी त्यांना करार करून दिले होते. या हक्कांची सरकारी सनद शके १६७४ फाल्गुन शुद्ध ४ ची आहे. हे उत्पन्न कुंपनी सरकारचा अंमल सुरू होईपर्यंत या घराण्याकडे सुरळीत चालले होते; शके १७४० च्या सुमारास ते इंग्रजांनी बंद केले. त्याबद्दल त्या वेळी दामोदर गणेश पानसे यांनी इंग्रजांकडे तक्रार केली होती. केशवराव हे उदगीरच्या मोहिमेंत पडले. उदगीरचे युद्ध म्हणजे मराठ्यांनी गाजविलेल्या अनेक पराक्रमांपैकी एक मोठा पराक्रम होय. या युद्धांत केशवरावांनीं तोफांचा भडीमार करून शत्रूस जेरीस आणले. यांच्या माच्यापुढे शत्रूच्या तोफा बंद पडल्या व सैनिक दशदिशां पळू लागले. या प्रसंगी शत्रूकडील हत्ती व तोफा केशवरावांनी पाडाव करून आपल्या गोटांत आणिल्या. या युद्धाचे वर्णन अनेक ठिकाणी आले आहे. राजवाडे यांच्या पहिल्या, तिस-या व चवथ्या खंडांत, पेशव्यांच्या बखरीत, पेशवे दफ्तरांतील सनदपत्रांतील माहितींत वगैरे जागी ही हकीकत आढळते. राजवाडे यांच्या पहिल्या खंडांत पुढील मजकूर आहे. * मोंगलास, उदगिरीस, नजीक बेदर येथे गांठ श्रीमंताची पडली. तेथे युद्ध जाहले. परंतु ते माफक. त्याजवर मोंगल अवशास आला. वाटेस युद्ध होत आला. अवशाहून धारूरास येणार. २० कोस अवशीहून धारूर. त्यास तीन मुकाम, दहा कोस मोंगल आला. धारूरास र॥ व्यंकटराव निंबाळकर, लक्षुमणजी खंडागळे व