पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३६ पानसे घराण्याचा इतिहास. घोडदळी असल्याने त्यांत उत्तम व सर्वांगपूर्ण तोफखान्याची विशेष जरूरी भासली नाहीं. शके १६७६ चे सुमारास कुकडी नदीवर निझामाशी मराठ्यांचे जें युद्ध झालें या वेळी निझामाकडील पाश्चात्यांच्या हाताखाली व त्यांच्या कवाइतीने तरबेज झालेला तोफखाना पाहून पेशव्यांना आपल्या सैन्यांतील तोफखान्याची उणीव तीव्रतेने भासली. निझामाचा तोफखान्यावरील दरोगा ( मुख्य अंमलदार ) ब्रुस्सी नांवाचा एक तज्ज्ञ फ्रेंच माणूस होता. त्याच्या हाताखाली मुझफरखान नांवाचा एक गारदी नायब अधिकारी होता. त्याला हि तोफखान्याची चांगली माहिती होती. जमल्यास त्याला आपल्या पदरीं ठेवावें अशी खटपट पेशव्यांनी चालविली. परंतु प्रथम ही गोष्ट जमेना. पुढे कांही दिवसांनीं मुझफर व बुसी यांच्यांत बेबनाव झाला व मुझफर पेशव्यांच्याकडे आला. पेशव्यांनी त्याला आपल्या नौकरींत घेऊन त्याच्या सल्ल्याने तोफखान्याची सुधारणा करावी म्हणून पानशांस हुकूम दिला. मागें सांगितले आहे की, साता-यास खास छत्रपतींच्या फौजेत थोडासा तोफखाना होता. शाहुमहाराजांच्या अमदानीत वरील प्रसंगाच्या सुमारास माधवराव शिवदेव ( लक्ष्मण ) यांचे बंधु यशवंतराव शिवदेव ( लक्ष्मण ) हे त्या तोफखान्यावर दरोगा म्हणून होते. तेव्हां त्यांना व माधवराव यांना हि पेशव्यांनीं मुझफरपासून तोफखान्याचे शिक्षण घेण्यास सांगितले. कांही दिवसांनी उभयतांचे शिक्षण पुरे झाले. पुढे पुरं-- धरे ( पेशव्यांचे कारभारी ) व मुझफर यांच्यामध्ये कांहीं कामानिमित्त वितुष्ट आल्याने मुझफरने पेशव्यांची नौकरी सोडली. तेव्हां तोफखान्याच्या दरोग्याचे काम, माधवराव व यशवंतराव या दोघां भावांपैकीं, माधवराव जास्त शूर व साहसी असल्याने, त्यांच्याकडे सोपविले गेले. त्या जागेवर त्यांची नेमणूक होऊन, त्यांना त्या जागेची तैनात मिळू लागली (शके १६७५). पुढे मुझफरने पेशव्यांची नौकरी सोडून सावनूरच्या नबाबाची नौकरी पतकरली. पुढे श्रीमंत सदाशिवराव भाऊसाहेब यांनी नवाबाचा पराभव केल्यानंतर मुझफर हा पुन्हा पेशव्यांच्या तोफखान्यांत. पानशांच्या हाताखाली नाकर म्हणून राहिला होता. माधवराव यांच्या हातांखाली, यशवंतराव व त्यांचे सख्खे धाकटे बंधु महिपतराव है दोघे काम करीत होते, त्यांच्या कर्तबगारीवर त्यांना सरदारी मिळाली. माधवराव यांना तोफखान्याची मुख्य सरदारी दिली, तेव्हां त्यांना वार्षिक तैनात ८८४५ रुपयांची होती व ती त्यांच्या मृत्युपर्यंत चालू होती, असा उल्लेख आमच्या जवळील तैनात जाबत्याच्या नकलेंत आढळतो. त्यानंतर तोफखान्याच्या सरदाराबद्दल वार्षिक सरंजाम रोख ३२०० रुपयांचा असून खेरीज पोषाक एक हजार रुपयांचा मिळे. ही रक्कम वरील ८८४५ रुपयांच्या रकमेपेक्षां निराळी होती, की, तिच्या पोटांतील होती, हे नक्की समजत नाही. बहुधा ती पोटांतील असावी असे वाटते. एका कैफियतीत; माधवराव व यशवंतराव यांस “ इतलाखी नेमणूक जातीस. सरंजाम, रुपये ७५ हजार व स्वारी बद्दल ९० हजार असे सालीना' करून दिल्याचा उल्लेख आला आहे.