पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण तिसरें. झेबाचे कैदेत असतांना केलेली सेवा, व नंतर खाजगीकडे करीत असलेली नौकरी मनांत आणून मौजे गिर्वी तालुके इंदापूर हा संबंध गांव आणि कसबे बावडे येथे एक चाहूर जमीन व मौजे शेटफळ येथे अर्धा चाहूर जमीन इनाम करून दिली. (परिशिष्ट क्रमांक ३ पाहा. ) यापुढे, उत्तरोत्तर माधवराव यांस सरकारांतून मानसन्मान मिळत गेला. सल्लास अबैन मया व अलफ, जमादिलावल ६०७ ( शके १६६४ आषाढ शुद्ध ८ ) रोजी सरकाराने माधवराव यांस आब्दागिरीचा मान देऊन, खर्चासाठी नेमणूक करून दिली. त्यानंतर दोन वर्षांनी ( शके १६६६ ), सरदारीची तैनात पूर्वीपेक्षा जास्त वाढवून, सरकाराने यास निराळा तैनात जाबता करून दिला. याप्रमाणे, माधवराव -यांची उत्तरोत्तर ऊर्जितावस्था होत चालली. ४. माधवराव शिवदेव व तोफखान्याची सरदारी. माधवराव हे प्रथम पागे होते, असे वर आले आहे. त्या वेळी त्यांना तत्कालीन रिवाजाप्रमाणे अगदीं प्रथम सालीना तीनशे रुपयांची नेमणूक सरकारांतून मिळत असे. ती पुढे वाढत वाढत नऊ हजारांपर्यंत वाढली. आमच्या संग्रहीं माधवरावांच्या या तैनातीचा नक्कल केलेला एक जाबता आहे, त्यांत या वाढीचे आंकडे दिले आहेत; ते पुढे देतो. शके १६५७ मध्ये ही तैनात वार्षिक ३०० रुपये होती, ती एक वर्ष चालून पुढील सालीं म्हणजे शके १६५८ मध्ये ३५० रुपये झाली. (याच वेळीं माधवराव हे पेशव्यांच्या दिमतीस गेले होते. ) त्यानंतर चार वर्षांनी म्हणजे शके १६६१ मध्ये ३५० रुपयांची नेमणूक ५३३ रुपये झाली. या जाबत्याची तारीख मार्गे दिली च आहे. या च वेळी माधवरावांना तिस-या प्रतीचा पोषाख मिळाला. पुढे शके १६६४ मध्ये आब्दागिरीचा मान मिळाल्यामुळे नेमणूक हि वाढवावी लागली; ती आतां ५८३ रुपये झाली. पुढल्या वर्षी म्हणजे शके १६६५ मध्ये ७६७ रुपये तैनात करण्यांत आली; ती एक वर्ष चालून शके १६६६ त ९८४ रुपये पर्यंत वाढविण्यांत आली. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे शके १६६८ मध्ये ही रक्कम १३२२ रुपयांवर गेली; पुन्हा दोन वर्षांनी ( शके १६७० ) १८५३ रुपये नेमणूक करण्यांत आली. ती हि दोन वर्षे चालून शके १६७२ त एकदम ३३०९ रुपयांची तैनात करार झाली. या पुढे जी नेमणक झालेली आढळते ती तोफखान्याचे अंमलदार म्हणून जो सरंजाम मिळाला ला वेळची असावी असे वाटते. पेशव्यांकडे स्वतंत्र तोफखाना प्रथम फारसा नव्हता. छत्रपतींच्या खास फौजेंत जो काय असेल तो व पेशव्यांच्या फौजेंत जो थोडासा होता तो; एवढा च तोफखाना यांत होता. थोरल्या शिवाजीमहाराजांच्या पश्चात् श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या कारकीर्दीच्या मध्यभागापर्यंत मराठ्यांनी जी युद्धे केली ती:बहुतेक गनिमी काव्याची व