पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४ पानसे घराण्याचा इतिहास. नोमिलें. शिवाजीमहाराजांच्या पश्चात् संभाजीमहाराज व राजाराममहाराज यांच्या राजवटींत हे चार हि भाऊ बहुधा आपापल्या कामावर रुजू राहिले असावेत. औरंगझेबाने शाहुमहाराज यांस आपल्या जवळ नजरबंदीत ठेविले होते, त्या वेळी शिवाजपत व त्यांचे पुत्र खंडेराव व लक्ष्मणरावाचे चिरंजीव माधवराव हे 'महाराजांजवळ होते. असे एका कैफियतींत* लिहिलेले आढळते. तींत लक्ष्मणरावास शाहुमहाराजांनी पंधरा हजार रुपयांचा सरंजाम दिल्याचा उल्लेख आहे. । ३. पानशांना सरदारा. शाहुमहाराज गादीवर बसल्यानंतर हि वरील पानसे बंधु सरकारच्या चाकरीत होते. खंडो शिवदेव यास खाजगी खात्यांत नौकरी होती व माधवराव शिवदेव यास पागेत चाकरी होती. सन सबा अशरीन मया व अलफ, सफर, ६०९ ( शके १६४८ आश्विन शुद्ध ११ ) रोजी सरकारांतून माधवराव यांस त्यांच्या छोट्याशा पागेनिशीं माळव्यांत पाठविण्यांत आले. या वेळी माळव्याचा कारभार मोंगलाकडून निघून मराठ्यांच्या ( पेशव्यांच्या ) हाती आला होता. शके १६४८ च्या विजयादशमीनंतर श्रीमंत ( थोरले ) वाजीरावसाहेब यांनी आपल्या ढाला कर्नाटकाकडे फिरविल्या. त्यामुळे माळव्यांत संरक्षणासाठी जी फौज रवाना झाली, तिच्यांत च माधवराव यांचा हि समावेश झाला. या कामगिरीवर असतांना-माधवराव यांनी आपल्यावरील जबावदारी उत्तम प्रकारे पार पाडल्यामुळे श्रीमंतांची मर्जी त्यांच्यावर बसली व त्यांनी त्यांस शाहु महाराजांकडून आपल्याकडे घेण्याची इच्छा महाराजांजवळ प्रदर्शित केली. माधवराव हे शूर असल्याने व पेशव्यांनी त्यांची शिफारस केल्यामुळे महाराजांनी माधवराव यास पेशव्यांच्या दिमतीस दिले. या वेळेपासून पानशांची कामगिरी व नेमणूक पेशव्यांचे हातांखाली झाली. ही गोष्ट शके १६५७ त घडली. यानंतर, पेशवे, जेव्हा जेव्हां मोहिमांवर जात, तेव्हां तेव्हा आपल्या बरोबर माधवराव यांस त्यांच्या पागेनिशीं घेत असत.। भोपाळच्या लढाईत श्रीमंतांनी निजामाचा सपशेल पराभव करून, त्याला कोंडलें (शके १६५९ पौष ); या लढाईत माधवराव यांनी बहुत पराक्रम केल्यामुळे श्रीमंतांची मर्जी त्यांच्यावर पहिल्यापेक्षा जास्त बसली आणि त्यांनी शाहु महाराजांजवळ माधवरावांची प्रशंसा करून, त्यांची पूर्वीची जी तैनात होती ती वाढवून घेतली. हा तैनात जाबता, इहिद्दे आर्वेन मया व अलफ, जमादिलोवल ६०९ ( शके १६६२ श्रावण शुद्ध ११ ) चा आहे. या जावत्यांत माधवराव यांस तिस-या प्रतीचा पोषाख (दोन वस्त्रे ): सरकारांतून देण्याची नेमक झाली. तदनंतर शके १६६४ आषाढ शुद्ध षष्ठी रोजी शाहुमहाराज यांनी खंडो शिवाजी यास त्यांनी पूर्वी औरंग | * सरदार केशवराव बापूराव पानसे यांची कैफियत ( भारत वर्ष ).