पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण तिसरे..' (३३ होती. या प्रमाणे माणकोपंताच्या मुलाबाळांचा विस्तार मोठा असल्याने सोनोरीस राहून तेथील निम्या वृत्तीवर ( निम्मे वृत्तीचा वांटा रखमाजी बापूजीच्याकडे गेला होता ) उदरनिर्वाह करणे त्यांना जड वाटू लागले. त्यामुळे राजदरवारी किंवा सरकारी कचेरींत नौकरी शोधण्याची त्यांनी खटपट चालविली. त्यांचे वडील बंधु त्र्यंबकपंत हे सरकारी चाकरीत होते च. त्यांच्या वशिल्याचा माणकोपंतांनी उपयोग करून घेतला. त्र्यंबकपंताचे व शहाजी राजांचे मेव्हणे संभाजी मोहिते यांचे वैमनस्य होते. शिवाजीमहाराजांनी, स्वराज्यस्थापनेस आरंभ केल्यावर, आपले सावत्र मामा, जे हे संभाजी मोहिते, त्यांना आपल्या बाजूस वळविण्याचा प्रयत्न केला, तथाापे, तो सफळ झाला नाहीं; म्हणून महाराजांनी संभाजीचे ठाणे सुपे ( व सर्व सुपें महाल ) काबीज केले. नंतर त्यांनी मामास शहाजी राजाकडे पाठवून दिले. या खटपटीत त्र्यंबकपंताचे अंग असाथे, असे आम्हांस वाटते. आमच्या म्हणण्यास दोन पुरावे आहेत, एक वरूपंत व सभेदार ( किंवा मोकाशी ) संभाजी मोहिते यांचे वांकडे होते व सरें जा प्रसंगानंतर काही दिवसांनी शिवाजीमहाराजांनी माणकोपंताच्या तीन चार मलांना आपल्या पदरी ठेविले. महाराज माणसांचे मोठे पारखी होते व त्यामुळे आपल्या कार्याला जे उपयोगी पडतील त्यांचा ते आस्थापूर्वक संग्रह करीत असत; अर्थात्, जे आधीं च उपयोगी पडले त्यांचा योगक्षेम चालविणे त्यांचे ब्रीद च होते. त्यामुळे असे वाटते की, माणकोपंताच्या मुलांना जवळ करण्यांत महाराजांनी जी धोरणी दृष्टि दाखविली तिचा संबंध आम्ही म्हणतो त्या प्रमाणे लागतो. म्हणजे महाल मोहित्याकडून काबीज करण्याच्या राजकारणात त्र्यंबकपंत हे महाराज उपयोगी पडले असावेत; असो. एकदा ( वरील प्रसंग घडल्या नंतर ) शिवाजीमहाराज यांची स्वारी सासवडास आली, त्या वेळीं माणकोपत हे सासवडास गेल व महाराजांना जाऊन भेटले. तेव्हां महाराजांनी पंताचें नांव, गांव विचारून एकंदर हकीकत विचारली. पंतांनी ती सर्व सांगून आपण ( आधीच सरकार-चाकरीत असलेले ) त्र्यंबकपंत पानसे यांचे धाकटे बंधू होत असे सांगितले. त्यावर महाराजांनी भेटण्याचा उद्देश विचारला. तेव्हां पंत म्हणाले मला आठ पुत्र असून, माझा परिवार मोठा आहे; त्यामुळे एवढ्यांचा योगनेम सोनोरीच्या वृत्तींवर भागत नाही, यासाठी महाराजांनी मुलांना आपल्या पदरी बाळगण्याची व त्यांच्या कडून चाकरी घेण्याची कृपा करावी. महाराजांनी बहत व ? टान पंताच्या चार पुत्रांना सरकारी नौकन्या दिल्या. शिवाजीपंत यांस आपल्या जवळ हुजूर कचेरीत ठेविलें, लक्ष्मणपंत यास बारगिरीची असामी दिली, व संभाजपत यास तंजावरास ( आपले सावत्र बंधु ) व्यंकाजी राजे यांच्या दरबारी पाठविले. शिवजपंत हे जास्त हुशार व तत्पर दिसल्याने महाराजांनी त्यास आपल्या खाजगीकडे