पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३ ) तर पूर्णपणे त्यांच्यावरच सोपविण्यात आली होती. यामुळे या काळांतील महाराष्ट्राच्या इतिहासांत पानशांच्या कर्तबगारीचे प्रतिबिंब दिसून येते. | स्वराज्यसंरक्षणाच्या वावतींत स्वामिनिष्ट राहून पानशांनी केलेली अमोल कामगिरी प्रस्तुत इतिहासावरून चांगली लक्षात येईल. हिंदुस्थानचे राज्य मिळवितांना इंग्रजांना ज्यांच्यांशी दोन हात करावे लागले, अशा लोकांपैकी मराठे हे होत. मराठे हैं। इंग्रजांचे प्रबळ शत्रु असून इंग्रजांचे हिंदुस्थानांत जे पराजय झाले यांत वडगांवच्या लढाईतील पराजयाची गणना होते. पेशंव्यांस ( मराठ्यास ) मिळालेल्या या विजयाचे श्रेय ज्यांच्याकडे येते त्यांत भिवराव पानसे यांची गणना होते. भिवराव पानसे यांच्या त्या वेळच्या कर्तबगारीचे वर्णन शत्रुमित्रांनी मुक्तकंठाने केले आहे. इ. स. १८०८ नंतर मराठ्यांच्या पाडावाची चिन्हे दिसू लागलीं वे इ. स. १८१८ मध्ये तर मराठेशाहीचा अस्त झाला. ही गोष्ट डोळ्यांस स्पष्ट दिसत असून हि जे कर्तव्यनिष्ठ व शूर सरदार तिच्या बचावाचा शेवटला प्रयत्न करण्याकरितां लढले, त्यांत पानशांचा प्रामख्याने समावेश होतो. मराठेशाही बुडून इंग्रजी अमदानी सुरू होणार, तेव्हां इंग्रजांची बाजू घेऊन स्वार्थ साधून घ्यावा ही दृष्टि बापू गोखले, गणपतराव पानसे वगैरे सरदारांस शिवली नाही. ते अखेरपर्यंत स्वामिनिष्ठं राहिले व स्वामिकार्याकरितां त्यांनी स्वार्थ झिडकारला. पानशांचा मोठेपणा दाखविण्यास ही गोष्ट पुरेशी आहे. . ग्रंथाचे शेवटीं परिशिष्टें जोडली आहेत; त्यावरून ग्रंथांतील माहिती जुन्या अस्सल कागदपत्रांवरून घेतली आहे हे दिसून येईल, ग्रंथांतील विषयांची मांडणी मुद्देसूद रीतीने केली असून भाषा हि सुबोध व विषयास साजेशी आहे. पुस्तकाची छपाई व बाह्यांग ही सुंदर झालेली आहेत. स्थळविषयक चित्रे व अलीकडील पानसे घराण्यांतील कांहीं गृहस्थांची छाया चित्र यांच्या योगानें पुस्तकाच्या शोभेत भर पडली आहे. अस्त रावबहादूर के. रं. ऊर्फ आप्पासाहेब पानसे यांनी सतत तीन चार वर्षे परिश्रम करून सदर इतिहास जनतेसमोर ठेविला आहे, याबद्दल त्यांचे अभिनंदन करावें तितके थोडेच आहे. त्यांच्या कामगिरीने महाराष्ट्राच्या इतिहासांत खास भर पडली आडे, महाराष्ट्रांत पानसे घराण्यासारखीं जी इतर घराणी आहेत त्यांचे हि इतिहास अशाच रीतीने प्रसिद्ध झाल्यास रा. ब. आप्पासाहेब यांस व आम्हांस अतिशय आने र आहे. पानसे घराण्यांतील विद्यमान पुरुष सदर ग्रंथास सढळ हाताने मदत कर लच पण इतर महाराष्ट्रीयांनी हि आपुलकीच्या भावनेने त्यास आश्रय द्यावा अरु वाची त्यांस आग्रहाची विनंती आहे. प्रस्तुत ग्रंथाच्या परिशीलनाने महाराष्ट्रीयांच्या विद्यमान पिढीत नवचैतन्य उत्पन्न होवो अशी ईश्वरापाशी प्रार्थना करून ही लांबलेले प्रस्तावना पुरी करण्याची आम्ही परवानगी घेतों. पुणे.. .. १ गंगाधरराव नारायणराव मुजुमदार ता, २९ माहे सप्टेंबर सन १९२९. गंगाधरराव नारायणराव मंज । । । ।