पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण दुसरे. ३१ संच गांवांत तुमच्या प्रमाणे आमचा हि भाऊपणाचा वांटा पडतो. तुम्हीं नुकताच या पांच गांवांत सहाव्या ताक्षमेचा वांटा मिळविला आहे; तरी त्या सहाव्या तक्षिमेत आम्हांला चौथ्या तक्षिमेचा वांटा मिळावा म्हणजे तुमच्या वाट्याच्या तक्षिमेपैकी एक चतुर्थांश भाग आम्हांला मिळावा व उरलेला तीन चतुर्थांश भाग तुम्ही घ्यावा. आम्ही आमच्या वांट्याचा आणिक एक चतुर्थांश भाग तुम्हांस दिला, त्या मोबदला सोनोरीच्या ज्योतिषपणांतील निम्मा वांटा आम्हांस द्या व तुम्ही निम्मा घ्या आणि त्या खेरीज सोनोरीचे कुळकरणाची सबंध वृत्ति तुम्हीच करा, आम्हांला नको. ही तडजोड अखेरीस खंडो शिवदेव व लक्ष्मण माणको यांनी मान्य केली आणि त्याप्रमाणे पुरंधरे बंधूस कळविलें. सारांश हा पानशांच्या घरांतील वाद अशा रीतीने शके १६६०, कालयुक्त संवत्सरे, कार्तिक शुद्ध त्रयोदशी, सोमवारीं घरीं च मिटला. ( परिशिष्ट क्रमांक २ पहा ). ११. रखमाजी परशुराम । | लक्ष्मीधर यांना परशुराम ऊर्फ परसावा नांवाचा पुत्र असून त्या परसाव्यास सहा पुत्र होते व त्यांत रखमाजी म्हणून एक मुलगा होता, हे पूर्वी सांगण्यांत आलें च आहे. रखमाजी हे सर्वात धाकटे होते. त्यांनी विवाह केला नाहीं; अखेरपर्यंत ते ब्रह्मचारी च राहिले. लहाणपणापासून त्यांची वृत्ति विरक्तीची होती, त्यामुळे संसाराच्या मायाजाळांत ते सांपडले नाहीत. त्यांचे आचरण शुद्ध, सात्त्विक असून ते आचाराने शास्त्रशुद्ध वागणारे होते. परंतु दुर्दैवाने ते फार दिवस वांचले नाहींत. त्यांचा अंत दिवे येथे अकाली झाला. पुढे आपल्या पुतण्यांच्या स्वप्नांत येऊन त्यांनी सांगितले की, माझी या गांवीं योग्य जागी स्थापना करावी. माझी पानसे घराण्यावर पूर्ण कृपा आहे; कोणत्या हि मंगलकार्यात माझ्या कृपेमुळे विप्नांचा विध्वंस होईल, कार्यात अडथळा येणार नाहीं; रखमाजाच्या इच्छेप्रमाणे दिवे येथे त्यांची मुंजा म्हणून स्थापना केली. हल्लीं दिव्यास, कातोवाच्या देवळाच्या मुख्य दरवाजांत शिरण्यासाठी ज्या पायच्या आहेत, त्यांच्या पश्चिम बाजूस एक जुनाट घडीव दगडाचा पार व त्यावर मोठा पिंपळाचा वृक्ष आहे. या पारावरच रखमाजी यांची मुंजा म्हणून स्थापना केलेली आहे. अद्यापपर्यंत लग्नमुंज वगैरे मंगलकार्यात या मुंजास प्रथम अक्षत देण्याची व विघ्-नाशनार्थ त्याची प्रार्थना करण्याची चाल तेथील पानसे घराण्यांत रूढ आहे. रखमाजीची पुण्यतिथि श्रावण वद्य सप्तमी रोजी असते. हा कोणत्या शकांत वारला त्याचा शोध अद्यापि लागत नाहीं. पुण्यातथि मात्र रखमाजीचे पुतणे माणको विश्वनाथ यांच्या वेळेपासून आजपर्यंत अव्याहत पाळिली जात आहे. परशुरामपंताच्या सहा पुत्रांपैकी दोघांचे नक्कल झाले व चौघांचा मात्र वंश वाढलाः तो वंश दिवें व सोनोरी येथे सांप्रत नांदत आहे.