पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

: प्रकरण तिसरें, पानशांचा राजाश्रय लक्ष्मीधर यांचा पुत्र परशुराम याच्या वंशांतील पुरुषांची गोविंद विश्वनाथ यांच्या पर्यंतची हकिकत गेल्या प्रकरणांत सांगण्यांत आली आहे. परशुराम लक्ष्मीधर यांस विठोबा या नांवाचा एक भाऊ होता; विठ्ठलपंतास नारोबा म्हणून एक मुलगा झाला. या नारोबास मात्र पुत्र न झाल्याने त्याच्या शाखेचे नक्कल झाले. परशुराम लक्ष्मीधर यांचा दुसरा भाऊ बाबाजी नांवाचा होता. त्याच्या शाखेत रखमाजी बापूजी झाले. या रखमाच्या वंशजाचा सोनोरीच्या पानशांच्या वृत्तीमध्ये अर्धा वांटा पडला; तो अद्याषि चालू असून या शाखेस अर्धलीचे हिस्सेदार असे नांव अजून संबोधिले जाते. आतां, परशुराम लक्ष्मीधर यांच्या वंशजाची माहिती देतो. परशुरामास लुखाबा, रामाजी, विसाजी, कृष्णाजी, केशव व रखमाजी असे सहा पुत्र झाले; त्यांत लुखावा व रखमाजी यांचा निर्वंश झाला. दुसरा पुत्र रामाजी यास तुकोबा व विठोबा नांवांचे दोन पुत्र झाले. त्यांपैकी तुकोबाचा वंश चालला व विठोबाचे नक्कल झाले. केशव परशुराम यांच्या वंशाचे हि एक दोन पिढ्यांत नक्कल झाले. विसाजी परशुराम व कृष्णाजी परशुराम यांचा वंश मात्र बरा च वाढला. विसाजी परशुराम यांचे वंशजांस पुढे राजाश्रय मिळून तोफखान्याची सरदारी मिळाली. त्यामुळे आतां या शाखेची माहिती या पुढे देण्यात येत आहे. विसाजी परशुरामास एकंदर पांच पुत्र झाले; त्र्यंबकपंत, मोरोपंत, माणको पंत, गोविंदपंत व उद्धवपंत अशी त्यांची नांवें होती. त्र्यंबकपंत हे वडील असून त्यांनी रोजगारानिमित्त सोनोरी सोडिली होती. ते शहाजी राजे भोसले यांच्या कारकीर्दीत पुणे जुन्नर भागांतील सुभ्याचे कचेरीत सरकारी कामगार होते. शहाजीराजे यांचे मेव्हणे संभाजी मोहिते यांचे व त्र्यंबकपंत यांचे चांगलेंसे नसल्याने, त्र्यंबकपंत यांचे बंधु गोविंदपंत व रामाजी गांवखंडेराव यांचा जो सोनोरीच्या कुळकरणाबद्दल वाद चाळला होता, त्यांत अडथळा उत्पन्न झाला वगैरे हकिकत मागे आली आहे. गोविंदपंत हे बहुधा सोनोरीस राहून तेथील वृक्तींचा कारभार पहात असत. माणकोपंत हे चंदचंदावरचे राजापाशीं दिवाणागिरीचे ( शके १६०५ च्या सुमारास ) कामावर होते. ( सरदार यशवंतराव वामन पानसे यांनी इ. स. १८८३ ता. २६ एप्रिल रोजी दक्षिणेतील सरदारांचे एजंट मे. काडे साहेब यांस घराण्याचे हकिकतीचे पाठविलेले पत्र.) । २. गाणका विश्वनाथ व शिवाजीमहाराज, । माणकोपंत यांना एकंदर आठ पुत्र झाले. त्यांची नांवें अनुक्रमें शिवाजी. * लक्ष्मण, शामजी, सखाजी, अनंत, संभाजी, शंकराजी व साबाजी अशी