पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पानसे घराण्याचा इतिहास. लग जाऊन वाळाजीनें ही गोष्ट त्यांस सांगितली. बाळाजच्यिा पत्राची गोष्ट पुढे उघडकीस आल्यामुळे, निंबाजीनें खंडोपंताचा चुलता संभाजी माणको यांस कर्जाच्या पेंचांत अडकवून त्याच्याकडून आपल्याला पाहिजे तसे पत्र लिहून घेतले. तेव्हां रामचंद्र गोविंद यांनी पुरंदरास जाऊन, तेथील सरकारी अधिका-याजवळ तक्रार केली. तेव्हां, त्या अधिका-याने, पुढे निकाल करण्यात येईल असे सांगून, तावत्काल सोनोरीच्या कुळकरण व ज्योतिष या दोन्ही वृत्ति सरकारांत अमानत ठेविल्या. त्यानंतर तीन चार वर्षांच्या अवधीत वाळाजी मोरेश्वर व रामचंद्र गोविंद हे वारले. संभाजी माणका याचा भाऊ लक्ष्मणपत व त्याचा पुतण्या खंडोपंत हे यापूर्वीच, या तंटाभांडणांमुळे नेवाशाकडे रहावयास गेले होते. सोनोरीस गोविंद गोपाळ ( रामचंद्र गोविंद यांच्या चुलतभावाचा मुलगा ) व जगजीवन शामजी यांची लहान लहान मुले तेवढी रहात होतीं, कांही दिवसांनी खंडोपंत व लक्ष्मणपंत हे सोनोरीस परत आले. पूर्वी सांगितले आहे की, भुतो परशराम यांनी पुणे प्रांतांत नीरथडीच्या पांच गांव ( भवाळी उर्फ भोळी, तोंडल, गुणंद, लोणी वगैरे ) वृत्ति संपादन केल्या होत्या. या वेळी त्यांच्या वंशांतील जिवाजी साबाजी, महादाजी चिंतामण, खंडो नागनाथ व कान्हो केशव हे विद्यमान होते. यांच्या गांवी जाऊन खंडो शिवदेव व लक्ष्मण माणको यांनी त्यांच्या जवळ आपंली भाऊपणाची वाटणी मागितली. पण त्यांनी ती दिली नाहीं. तेव्हां खडो शिवदेव साता-यास पंतसचिवाकडे गेले. सचिवांनी या दोघा वादीप्रतिवाद्यांनां मौजे चांदक प्रांत वांई हे स्थळ नेमून दिले. तेथे गोतसभा भरून गोताने वरील पांच गांवांत सहावी तक्षीम पाडून ती खंडो शिवदेव व लक्ष्मण माणको यांस जिवाजी साबाजी वगैरे मंडळी कडून देवविली. या प्रसंगानंतरं लक्ष्मण माणको व खंडो शिवदेव हे चुलते-पुतणे श्रीमंत थोरले बाजीराव साहेब पेशवे यांना, मौजे खंडेराजोरी ( प्रांत मिरज) येथे त्यांच्या फौजेचा मुक्काम. असतां, जाऊन भेटले व निंबाजीचा आणि आपला वाद तोडावा म्हणून त्यांनी श्रीमंतांस विनंति केली. तेव्हां श्रीमंतांनी त्यांना सासवडास पाठवून तेथील देशपांडे मल्हार तुळदेव पुरंधरे व महादाजी अंबाजी पुरंधरे यांना त्यांचा तंटा तोडण्यास आज्ञा केली. त्यांनी उभयतां वाद्यांस आपसांत समजूत करण्याचा प्रयत्न करावयास सांगितले. त्याप्रमाणे निंबाजी व खंडोपंतादि भाऊ आपसांत वाद तोडावयास बसले. निंबाजीने म्हटले की, सोनोरीच्या कुळकरण व ज्योतिष दोन्ही वृत्तींतील आपल्या हिश्शाचा वांटा पूर्वी रखमाजीपंतांनीं तुमच्या वडिलांस दिला आहे; तो सर्व च आम्ही परत मागतों, पण तुम्ही देत नाही, तर आतां निदान ज्योतिषाचा वांटा तरी तेवढा द्या व कुळकरण आपल्याकडे ठेवा. तथापि, हे हि म्हणणे खंडोपंताचा पक्ष मान्य करीना. तेव्हां निंबाजीनें निराळे च प्रकरण उपस्थित केले. त्याने सांगितले कीं, नीरथडीच्या