पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

: प्रकरण दुसरे...! २९, यांच्यासह ) हा वाद चालवून, अखेरीस त्यांत वर सांगितल्या प्रमाणे यश मिळविलें. परंतु, हे यश त्यांना महागांत पडले; कारण, या भांडणांत त्यांना फार खर्च पडून कर्जवाम झाले, त्यामुळे वादाच्या निकालानंतर गोविंदपंतांनी पुन्हा रखमाजीस व त्याच्या भावांस विनंती केली की, मागे तुम्हीं मदत केली नाही, पण आतां तरी, करावी; निम्मे खर्च तुम्ही द्यावा व स्वतःची निम्मे तक्षीम राखावी. वास्तविक सोनोरीच्या ज्योतिषकुळकरण या दोन्ही वृत्तींत रखमाजीची अर्धी वांटणी असल्याने त्याने वरील वादाबद्दल झालेल्या खर्चाचा निम्मे खर्च सासणे योग्य च होते. पण, त्याच्याजवळ पैसा नव्हता व कर्ज काढून रक्कम भरावी तर कर्जापायीं स्वतःची तक्षीमच सावकाराच्या पदरी पडावयाची. तेव्हां तक्षम दुस-याच्या घरांत जाऊ नये, घरांतल्या घरांत रहावी असा शहाणपणाचा विचार करून, रखमाजी व त्याचे भाऊ यांनीं यावेळी आपली निम्मे तक्षीम खर्चाच्या मोबदल्यांत गोविंदपंतादि भावांस राजीखुषीनें देऊन टाकली व याबद्दलचे पत्र शके १५९० फाल्गुन वद्य तृतीया, बुधवार या दिवशी करून दिले; म्हणजे मोहरीचे दिव्य झाल्यानंतर एक महिन्यानें हैं वांटपपत्र झालें. ( खरे जंत्रीप्रमाणे वरील तिथीस बरोबर बुधवार च येतो. ) या गोष्टीनंतर साठ पांसष्ठ वर्षांनीं रखमाजी पानसे याचा पुतण्या निंबाजी बाबाजी याने गोविंदपंताचा मुलगा रामचंद्र व नातु खंडो शिवदेव आणि त्यांच्या तक्षिमेंतील इतर भाऊबंद यांच्यांशीं तंटा सुरू केला. त्याचे म्हणणे कीं, रखमाजीच्या वेळीं तो गरीव असल्याने, त्याला गोविंदपंताचा निम्मा खर्च देता आला नाही, पण, सध्या आपला स्थिति सुधारली आहे; तरी तो निम्मा खर्च व आतांपर्यंतचे त्याचे व्याज घेऊन तुम्ही आपल्या वृत्तीची निम्मे तक्षम ( जी रखमाजी व त्याचे भाऊ यांनी गोविंद पंतास खर्चाच्या पोटीं दिली होती, ती ) आपल्याला परत द्यावी. पण, ही गोष्ट रामचंद्र गोविंद वगैरे मंडळी कबूल करीनात. तेव्हां या दोन्ही पक्षांत हा वाद वाढून तो त्नीन चार ठिकाणी मिटविण्याचे प्रयत्न झाले, पण, ते फुकट गेले. शेवटी, एकदां इतर कोणी भाऊबंद जवळ नाहींत अशी संधि पाहून, निंबाजी बाबाजी याने रामचंद्र गोविंद याचा चुलतभाऊ बाळाजी मोरेश्वर यांच्यापासून, दिवे गांवीं, बलात्काराने आपली निम्मे तक्षीम सोडल्याचा कागद लिहून घेतला. पण, बाळाजी हि कच्चा नव्हता. त्याने त्या कागदांत, तुकाराम बोवाची एक मेख ठोकून ठेविली. सर्व कागद, लिहून झाल्यानंतर शेवटी, * बिकलम ” अशी अक्षरे लिहून त्याच्यापुढे लेखकानें सही करण्याची पद्धति त्या काळीं; होती. त्याप्रमाणे बाळाजीने सर्व कागद लिहून * जिकलम ' ही अक्षरे लिहिली व त्याच्यापुढे स्वतःची सही न करता * जुलूम ” असा शब्द लिहिला आणि कागद निंबाजीच्या हवाली करून ताबडतोब घरीं आला, गडबडीत असल्याने निंबाजीने ते पाहिले नाहीं. या वेळीं खंड शिवदेव हे मौजे करंदी परगणे नेवासे येथे होते. त्यांच्याकडे लगो