पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पानसे घराण्याचा इतिहास. - या दुस-यांत, हातांत तापलेला गोळा घेण्याऐवजी, ताम्हनांतून किंवा कढईतून कडकडीत तापलेल्या तेलांतून सोन्याचा रवा (तुकडा) काढीत असत. मात्र पहिल्या प्रकारांत दोन्ही हात उपयोगांत आणीत आणि दुसन्यांत फक्त उजवा हात उपयोगांत आणत. बाकीची कृति दोहों प्रकारांत सारखीच असे. या पानसे-गांवखंडेराव वादांत अमृतेश्वरीं जें दिव्य झालें तें दुस-या प्रकारचे होते. वर सांगितल्याप्रमाणे रविवारी सकाळी पहिल्याप्रहरी न्यायसभा भरून, गोविंद विश्वनाथ व रामाजी कृष्ण यांस आणून त्यांच्या हाताच्या पिशव्या काढल्या. सात मंडलाच्या पलीकडे दोन खोल ताम्हनें निरनिराळी ठेविली. प्रत्येक ताम्हनांत अडीच शेर तेल व अडीच शेर तूप एकत्र करून घातलें व ते खूप कडकडीत तापविल्यावर त्यांत सोन्याचे दोन रवे टाकले. हा रवा साधारण दोन मासे भार वजनाचा असतो. पानसे व गांवखेडराव यांच्या हातांच्या पिशव्या काढून त्यांच्या डोक्यावर त्यांच्या शपथेवरील प्रतिज्ञे ( जवान्यां ) ची चीरपत्रं बांधून, दोन वेगवेगळ्या काढलेल्या सात मंडळांतून त्यांना चालविले. ताम्हनापाशी आल्यावर, प्रथम गोविंद विश्वनाथ पानशांनी आपल्या ताम्हनांत हात घालून त्या कडकडीत तेलातुपांतून सोन्याचा रवा बाहेर काढला. त्यानंतर रामाजी गांवखंडेरावाने आपल्या ताम्हनांत हात घातला, परंतु रवा बाहेर काढण्यापूर्वीच बोटे भाजली. रवा बाहेर काढतां आला नाही. रामाजीची ही गोष्ट त्याच वेळी न्यायसभेने पाहिली. तथापि दिव्याच्या नियमाप्रमाणे त्या वेळीं निकाल न देतां, पुन्हा दोघांच्या हातांस पिशव्या घालून व त्यांवर मोहरा करून त्यांना पाहन्यांत ठेविलें. सोमवारचा दिवस त्यांस तसेच ठेऊन, मंगळवारी म्हणजे दिव्याच्या तिस-या दिवशी या दोघांनां पहा-यांतून बाहेर काढले. व पुन्हा न्यायसभेपुढे आणले. तेथे आल्यावर सर्वांच्या देखत त्यांच्या हातांच्या पिशव्या सोडल्या व हात पाहिले. त्यांत पानसे यांच्या हातास कांहीं इजा झाली नाहीं असे दिसून आले. गांवखंडेराव याच्या हातास पोळल्यामुळे फोड आलेले दिसले. अर्थात् नियमाप्रमाणे पानसे खरे झाले व गांवखंडेराव खोटे झाले. तेव्हां सभेनें, मौजे सोनोरीचे कुळकरण गोविंद विश्वनाथ पानसे यांचे कायम ठरवून त्यांनी ते लेकरांचे लेकरी म्हणजे वंशपरंपरा करावे, रामाजी गांवखंडेरावाचा त्या वतनाशी कांहीं संबंध नाहीं असे निवाडपत्र दिले. हे दिव्य शके १५९० कीलकसंवत्सर, माघ शुद्ध त्रयोदशी, बुधवारी झालें. ( गणित करून पाहिले असतां शके १५९० सालच्या माघ शुद्ध त्रयोदशीस वुधवार येतो. ) | वरील निवाडपत्र घेऊन दोघे वादीप्रतिवादी हे राजगडास शिवाजीमहाराजांकडे आले; तेथे महारजांच्या राजसभेने ते पाहून व रामाजीचे भाजलेले हात हि पाहून पानसे हे सोनोरीचे खरे कुळकरणी असून गांवखंडेरावाचा त्या कुळकरणाशी कांहीं संबंध नाही, त्याने आतापर्यंत आपल्यापाशीं कुळकरणाच्या कामाबद्दल जीं कांहीं