पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

... प्रकरण दुसरे... ३७ व तो तितका तापला आहे की नाही हे पाहण्यासाठीं कुंडाबाहेर काढून त्याच्यावर वाळलेले गवत टाकीत. ते गवत एकदम पेटलें म्हणजे गोळा पाहिजे तेवढा तापला असे समजत. मग ज्याला दिव्य करावयाचे असेल त्याच्या हाताची पिशवी, मोहर फुटली नाही अशी खात्री करून, काढून घेत. कारण अग्निबाधा होणार नाही अशी कांहीं औषधं असत, ती हा गृहस्थ पहारेक-यांस लांचलुचपत देऊन व पिशवी काइन हातांस लावण्याचा संभव असे. यासाठी मोहरेची खात्री करावी लागे. अशी खात्री झाल्यावर या गृहस्थाच्या दोन्ही हाताच्या ओंजळांत पिंपळाची पांच सहा पाने ठेवत व त्यांना तूप चोपडीत. नंतर त्याने दिलेली शपथेवरील जबानी व कधी कधी राजीनामा त्याच्या डोईस बांधीत, त्यास चीरपत्र किंवा भालपत्र म्हणत. मग त्याच्या कडून जवानीतील सर्व मजकूर पुन्हा वदवून घेत. नंतर महाराकडील पाणी आणून एका कुंडांत ठेवीत आणि त्याच प्रमाणे मांगाकडील पाणी दुस-या कुंडांत ठेवत व त्याच्या कडून त्याची शपथ घेववीत. तसेच मांगामहारांचे वस्त्र आपल्या मस्तकावर ( जर आपण खोटे बोलू तर ) बसो, अशी हि शपथ घेववीत. शपथक्रिया झाली म्हणजे त्याच्या ओंजळींतील त्या तूप चोपडलेल्या पानांवर, लोहार आपल्या सांडसानें तो तापून लाल झालेला लोखंडी गोळा ठेवा. पुढे, दुसरा वादी आपल्या वस्त्राची छाया या दिव्य करणाच्या वाद्याच्या डोकीवर करी. नंतर हा वादी तो गोळा घेऊन एका मंडळांतून चालून दुस-या मंडळांत व तेथून तिस-या मंडळांत जाई. या प्रमाणे सात हि मंडळे चालून गेल्यावर पलीकडे एक वाळलेल्या गवताची पेंढी ठेवलेली असे तिच्यावर तो गोळा टाकी. गोळा टाकल्यावर त्या गवताने पेट घेतला पाहिजे; म्हणजे इतकी क्रिया होई पर्यंत त्या गोळ्याची उष्णता कमी होता कामा नये. इतका प्रकार झाल्यावर, पुन्हा, या गृहस्थाच्या हातांस पिशवी घालून मोहोर करून कोठडीत पहायांत ठेवीत. दोन दिवस कोठडीत ठेविल्यावर तिसरे दिवशीं वरील सर्व न्याय देणाच्या लोकांसमोर त्याला आणून व पिशवीची मोहोर फुटली नाही अशी खात्री करून घेऊन मग पिशवी उघडीत. त्या नंतर दिव्य करण्यापूर्वी हातांच्या ज्या खाणाखुणा टिपून ठेविल्या असत त्या पूर्णपणे ताडून पाहात. पूर्वी पेक्षा जास्त खुणा, उदाहरणार्थ, फोड, फुटकुळ्या वगैरे ( भाजलेल्या खुणा ) दिसल्यास, ज्या मनुष्यास दिव्य करावे लागलें, तो दिव्यांत खोटा ठरला असे ठरवून सर्व न्यायसभा त्याच्याविरुद्ध निकाल देई. जर त्याचे हात पूर्वी प्रमाणेच असतील, फोड वगैरे आले नसतील, तर तो वादी दियीं उतरला अथवा दिव्यांत खरा ठरला. असे ठरवून, सभा त्याच्या बाजूने निकाल लावी. . दिव्याचे अनेक प्रकार श्रुतिस्मृतीमधून सांगितलेले आहेत; त्यांपैकीं त्याकाळी महाराष्ट्रांत फक्त दोन प्रकार प्रचारांत होते. वर सांगितलेला एक व खाली दिलेला दुसरा.