पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण दुसरे. कागदपत्रे ठेविली असतील ती पानशांस परत करावी, जीं खोट निवाडपत्रे आपल्या बाजूची करून घेतली अमतील ती रद्द समजावत आणि हैं कुळकरण गोविंद विश्वनाथ पानसे यांनी या पुढे वंशपरंपरा करावे, असा एक राजमुद्रांकित व राजसभेतील सभासदांच्या मुद्रांचा महजर ( राजसभेने दिलेले निवाडपत्र ) करून दिला आणि सोनोरच्या सरकारी अधिका-यास त्याची नक्कल हुकुम म्हणून पाठविली. | याच वेळी म्हणजे शके १५९० च्या माघ वद्य प्रतिपदा शनिवारी ( खरे जंत्री प्रमाणे या दिवशीं शनिवार येत आहे ) वरील निकालान्वयें राजगड येथे गोविंदपंत पानसे यांस रामजी कृष्ण गांवखंडेराव यानें एक अजीत पत्र ( जितपत्र ) लिहून दिले. त्यांतील मजकूर असा की, “ तुमचे चुलते लुखो परशुराम यांनी सोनोरीच्या कुळकरणावर आपल्यास मुतालिक ( गुमास्ता ) म्हणून ठेवले होते, पण, आपण बेइमान होऊन सरकारास गैर वाजवी सांगून त्यांच्या कडून आपल्या नांवचे कांहीं हुकूम काढून आणले. हे आपण खोटे कृत्य केले. अमृतेश्वरीच्या दिव्यांत आपण हरलों, तुम्ही खरे झालां; आपल्याला देवाने मिराशी वेगळे केले, देवा घरीं, राज घरां व गोत घरीं आपण खोटे झालो, तमाम लोकांनी तुम्ही खरे म्हणून टाळी पिटली; म्हणून सभानायकांनी हे जितपत्र लिहावयास मला सांगितले ते लिहून दिले. तुम्ही सोनोरांचे कुळकरण वंशपरंपरा खाणे, माझा किंवा माझ्या वंशजांचा त्याच्याशी कांहीं संबंध नाही, अशा मजकुराचे हें जितपत्र आहे. याप्रमाणे हा सोनोरीच्या कुळकरणाचा तंटा संपून ते पानशांकडे कायम झालें. वरील शिवाजीमहाराजांचे राजपत्र, गिधव्यांचे दानपत्र, मोहरी दिव्याचे थळपत्र, व रामाजी गांवखंडेरावाचें अजीत पत्र, अशी चार पत्रे, पुढे जीर्ण झाल्यामुळे, गोविंद विश्वनाथ पानसे यांचे नातु खंडो शिवदेव यांनी, शाहु महाराजांच्या राजवटीत साता-यास जाऊन वरील कागदान्वयें एक राजपत्र शके १६६४ फाल्गुन शुद्ध चतुर्दशीस करून घेतले. ( परिशिष्ट क्रमांक १ पहा.) ९. शिवाजीमहाराजांची न्यायनिष्ठुरता. वरील गोविंद विश्वनाथ व रामाजी खंडेराव यांच्या वादांत जानोजी बिन हौजी" काळे सोनोरीकर पाटील याने खोटी साक्ष दिल्याचे मागे आलेच आहे. दिव्यांत रामाजीपंत खोटा ठरला तेव्हा या जानोजीस शिवाजीमहाराजांनी खोटी साक्ष दिल्याबद्दल जीभ कापण्याची शिक्षा दिली. महाराजांची न्यायनिष्ठुरता प्रसिद्ध च आहे. ही शिक्षा अमलांत आली असती, पण गोविंद विश्वनाथ यांनी महाराजांजवळ दया भाकून या शिक्षेऐवजी सरकारांत दंड भरून जानोजीची सुटका करविली. दंडाची रक्कम गोविंदपंतांनी भरली. या उपकाराबद्दल जानोजीने व समस्त गांवक-यांनी सोनोरी येथील तरटीचे सहा रुक्याचे एक शेत वंशपरंपरेने पानसे यांस इनाम करून दिले; मात्र त्याचा राजभाग गांवक-यांनी भरावयाचा असे ठरविले. सरकारनेंहि तें गांव निस