पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पानसे घराण्याचा इतिहास. तो प्रश्न, निराळा; पण त्या वेळी या प्रकारास वादीप्रतिवादी या दोघांना हि कबुली द्यावी लागे व त्यांत झालेला निर्णय त्यांना अखेरचा म्हणून मान्य करावा च लागे. अशा या दिव्याची माहिती समजण्यासाठी मूळच्या कागदांतील सारांश थोडक्यांत पुढे देतों. ( परिशिष्ट क्रमांक १ पहा. ) १. पानसे व गांवखंडेराव यांना सरकारने दिव्य करावयाचे नेमून दिल्यावर त्या दोघांकडून प्रथम पुढील प्रमाणे राजीनामे लिहून घेतले. दोघांनी वेगवेगळालीं दिव्यें करावी; त्यासाठी दोन तपेल्या घ्याव्यात, दोन ताम्हने घ्यावीत, व दोन रवे घ्यावत, आणि दोघांनी बरोबरच दिव्ये करावीत. जो खरा होईल त्याला कुळकरणाची वृत्ति वंशपरंपरा मिळेल, जो खोटा होईल त्याची वृत्त काढून घेतली जाईल, दोघे खरे झाले तर ( असे सहसा होत नसे ) वतन दोघांत निम्मे निम्मे वाटून मिळेल, दोघे खोटे झाल्यास ( असे हि सहसा होत नसे ) दोघांना हि वतनावरून हाकलून दिले जाईल, या प्रमाणे दोघांनी राजीनामे लिहून दिले. त्या नंतर सरकाराने बाबाजी मोरदेव चिटणीस व मलकोजी कदम नांवाचा हुजुरातांतील एक अंमलदार या दोघांस सरकारतर्फेचे मुख्य अधिकारी म्हणून मोहरीस पाठविले. या शिवाय अष्टप्रधानांचे कारकून व हुजरे हि रवाना झाले. त्यांच्या अध्यक्षतेखालीं दिव्य व्हावयाचे होते. दिव्याच्या वेळीं; मौजे सोनोरीचे मोकदम व बलुते आणि मौंजे मोहरीचे हि मोकदम, वाजे ( इतर ) प्राष्णिक ( प्रश्न विचारणारे ) लोक व हमशाही गोत हजर होते. या सर्वांपुढे प्रथम गोविंद विश्वनाथ पानसे यांनी सांगितलें कीं, गिधव्यांनी आपल्या पूर्वजांस कुळकरण मिरास करून दिले असून त्यांच्याशी गांवखेडेरावाचा कांही संबंध नाही. त्यानंतर रामाजी कृष्ण गांवखंडेरावाने सांगितले कीं, कुळकरण पूर्वीपासून आमचे आहे, गिधवी किंवा पानसे यांचा कांहीं संबंध नाही. या प्रतिज्ञेनंतर साक्षीदारांच्या साक्षी घेतल्या. प्रथम पानशांकडून दिव्य कराविलें. दिव्य बहुधा रविवारी करीत असत. त्यांस अनुसरून शनिवारी पानसे व गांवखंडेराव यांच्या उजव्या हातांच्या बोटांची नखें न्हाव्याकडून काढविली. नंतर हातांस लिंबू आणि साबण लावून बाटें स्वच्छ केली आणि मग निरनिराळ्या कापडांच्या पिशव्यांत हातांचे पंजे घालून, पिशव्या बांधून त्यां वर सरकारी अधिका-यांच्या मुद्रेच्या मोहरा केल्या आणि दोघांना निरनिराळ्या कोठड्यांतून पहायांत ठेविलें. पिशव्या घालण्यापूर्वी पंजावरील व बोटांवरील बारीक सारीक सर्व खाणाखुणा टिपून ठेवण्यांत आल्या. रविवारी दुसरे दिवशीं दिव्यास प्रारंभ झाला. वेळ सकाळची पहिल्या प्रहराची होती. श्रीअमृतेश्वराच्या देवळांत दोघे सरकारी अधिकारी, दोघे वादीप्रतिवादी आणि मार्ग सांगितलेले दोन्ही गांवांतील मोकदम, बलते व प्राष्णिक मंडळी जमला. दिव्याचा प्रकार साधारण पुढीलप्रमाणे असेः-ज्या ठिकाणी दिव्य होत असे, त्या ठिकाणी सात मंडळे काढलेली असत व त्यांच्या शेवटी एक अग्निकुंड असे. या अग्निकुंडांत साधारण अच्छेर वजनाचा एक लोखंडी गोळा लोहाराकडून लाल होईपर्यंत तापवीत