पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २ ) इतिहास प्रसिद्ध झाले. सुप्रसिद्ध पानसे घराण्याच्या इतिहासाने अशा त-हेच्या वाड्यायांत एक चांगल्या प्रकारची भर पडत आहे यात शंका नाहीं. | स्वराज्याच्या उज्ज्वलं कालांत पुष्कळ घराणे पुढे आली. त्यांपैकी पानशांचे घराणे होय. देशस्थ ब्राह्मण घराण्याचा हा पहिलाच इतिहास प्रसिद्ध होत आहे. याबद्दल लेखकाचे अभिनंदन करावे तितकें थोडेच. लेखकाने अत्यंत परिश्रम घेऊन माहिती मिळवून प्रस्तुत इतिहास संकलित केला आहे. यांत पानले घराण्यांतल तेवीस पिढ्यांचा म्हणजे सुमारे सहाशे वर्षांचा इतिहास वाचावयास मिळतो. या तेवीस पिढ्यांतील सर्व पुरुषांचा अत्यंत व्यवस्थित असा वंश-वृक्ष पुस्तकाच्या आरंभी च देण्यांत आला आहे. तसेंच व्यक्तिविषयक माहिती देणारे एक प्रकरण पुस्तकाचे शेवटी आहे. त्यावरून विद्यमान असलेल्या प्रत्येक पानसे. उपनांवाच्या व्यक्तीस आपल्या घराण्यांतील पूर्वजांची नांवें कळण्याची व प्रसिद्ध पुरुषांचा परिचय होण्याची सोय झाली आहे; त्यामुळे पानशांना प्रस्तुत पुस्तकाबद्दल वाटणा-या आपलेपणांत भर पडेल असा भरंवसा आहे। - पानसे मूळचे राहणारे कोठले, त्यांच्या, उपशाखा कशा झाल्या, त्यांचा विस्तार कोठे कोठे कसा होत गेला, त्यांच्या इनाम जमिनी, इनाम गांवें, रहाते वाडे, ज्यातिषकुलकर्णादि वृत्ति वगैरेंची संपूर्ण माहिती प्रस्तुत ग्रंथांत सविस्तर रीतीने देण्यांत आली आहे. .. .. पुस्तकांतील कांहीं कांहीं प्रसंग चमकृतिपूर्ण, मनोरंजक व पानशांच्या घराण्यांतील निरनिराळ्या व्यक्तींच्या आंगांतील धाडस, व्यवहारचातुर्य, प्रसंगावधान, शॉय वगैर गुणांचा वाचकांस परिचय करून देणारे आहेत. संकट-परंपरा ही मनुष्याच्या मोठेपणाची कसोटी असते, ह्या गोष्टीचा प्रत्यय पुस्तकांत जागे।जाग येतो. “बाले घाटाची दंतकथा " * महाराष्ट्रांतील पन्ना " * दिव्यासंबंधी प्रकरणे हीं वाचली असतां वरील गोष्ट सल्यास पटणारी आहे. पूर्वीच्या काळीं वतन संभाळण्यास किती कष्ट लागत, न्याय देण्याच्या पद्धति कशा असत, दिव्य करण म्हणजे काय वगैरे सर्बधान सविस्तर माहिती प्रस्तुत पुस्तकांत देण्यांत आली आहे. - स्वराज्याच्या अमदानीत विशेषतः पेशवाईच्या उत्तरार्धात राज्यव्यवस्थेचीं जीं अनेक खाती उपलब्ध होती, त्यांत तोफखान्याचा प्रामुख्याने अंतर्भाव केला जाई. एक काल तर असा होता की, त्याकाळीं पानसे व तोफखाना हे शब्द पर्यायवाचक बनले होते. तोफखान्यास व्यवस्थित स्वरूप देण्यांत आल्यापासून त्याची व्यवस्था पानसे घराण्याकडेच होती. अशा प्रकारच्या महत्त्वाच्या खात्यावर पानशांची नेमणूक झाल्यामुळे इ. स. १७३६ ते १८१८ या कालांतील महाराष्टांतील उलाढाली व लढाया, यांची हकीकत सदर पुस्तकांत आली असल्यास नवल नाही. या काळातील नित घराण्याचा इतिहास म्हणजे महाराहाचा त्रोटक राजकीय इतिहास च होय अस म्हणता येईल. वरील काळांतील राजकीय घडामोडींत कधी प्रामुख्याने तर कधी दुय्यम आयन कारी म्हणून पानसे घराण्यांतील पुरुषांनी भाग घेतल्याचे आढळून येते. काही काम