पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण दुसरे. २३ करण गोविंद विश्वनाथ पानसे यांच्या नांवाचे करून तसा हुकूम काढला. मात्र गोतसभेपुढे महजर व्हावयाचा राहिला. कारण रामाजी गांवखंडेरावानें गोतसभेपुढे वाद मांडण्याचे कबूल केले नाही. यानंतर पुण्यास शिवाजीमहाराजांचा अंमल पुन्हा बसला, त्या वेळी राजगडच्या सरकारी न्यायसभेपुढे हा वाद पुन्हा चालला. त्यांत रामाजी खोटा ठरला. त्यामुळे, त्याने सांगितले की, “ मौजे सोनोरीचे मोकदम, मोख्तसर, बलुते व हमशाही गांवांचे गोहीदार गोत हुजूर आणून त्यांच्या कडून निवाडा करवावा.” त्याप्रमाणे मागे सांगितलेली दहा गांवें व शिवाय मौजे बेलसर व हिवरें अशा बारा गांवांतील मोकदम, मोख्तेसर, बलुते व हमशाही गोत यांच्या तोंडी व लेखी जवान्या सरकाराने घेतल्या. त्यांत फक्त एका साक्षीदाराखेरीज बाकीच्या सर्व साक्षीदारांनी गोविंद विश्वनाथाच्या बाजूच्या, म्हणजे च ख-या साक्षी दिल्या. मागे आलेल्या हौजी पाटलाच्या जानोजी नांवाच्या मुलाने तेवढे सांगितले की, रामाजी गांवखंडेराव हा खरा कुळकरणी आहे. गोतसभेचा असा एक नियम दिसतो की, तेथे झालेला निवाडा एकमताने झाला पाहिजे. तसा तो न झाला तर वादीप्रतिवादींपैकी कोणास हि तो अमान्य करावयास सवड असते. मात्र अमान्य केल्यावर दोघांनी दिव्य करावे लागते. या नियमाप्रमाणे या राजगडच्या सरकारी न्यायसभेपुढे जी गोतसभा झाली, तांत एकमताने निर्णय न झाल्याने सरकाराने दोघां हि वादीप्रतिवादींस निरनिराळे दिव्य करण्यास परवानगी दिली. ८. मोहरीचें दिव्य. (दिव्या'चे सविस्तर वर्णन. ) दिव्य हे एखाद्या पुरातन प्रसिद्ध शंकराचे देवालयांत देवासमोर करीत असत, अन्यायी व लबाड लोकांवर दया माया न करता त्यास कडक व भयकर शिक्षा करणारें हैं तामसी वृत्तीचे दैवत असल्यामुळे या दैवताच्या समोर ते करावे लागत असे. दिव्य करण्याचे स्थळ व दिवस न्यायसभा अगाऊ ठरवून देत असत. सरकारच्या हुकुमाप्रमाणे गुंजण मावळ तर्फेतील मौजे मोहरी* येथील श्री अमृतेश्वराच्या देवळांत गोविंद विश्वनाथ पानसे आणि रामाजी कृष्ण गांवखंडेराव यांनी निरनिराळे दिव्य केलें. त्या काळीं मनुष्यकृत पुराव्याने तंट्याचा निकाल झाला नाहीं तर हा दिव्य करण्याचा शेवटचा एक दैवी प्रकार होता. दिव्यांत जो सुरक्षित बाहेर पडेल तो खरा ठरे व ज्याचे नुकसान होई तो खोटा ठरे. हातास फोड येणे, गुरेढोरे मरणे, घरांस आग लागणे वगैरे गोष्टींचा समावेश या नुकसानीत करीत. या दिव्यावर तत्कालीन लोकांचा या चांगला बसलेला दिसतो. कारण, त्या काळी न्यायाचा शेवटचा प्रकार म्हणजे निय असे, आज जसे प्रिव्ही कौन्सिल म्हणजे न्यायदानाचे अखेरचे ठिकाण समअसे जाते. तसे त्या काळी दिव्य करणे म्हणजे न्यायाचा शेवटचा प्रकार समजला जाई. सांप्रतच्या काळी या दिव्याच्या प्रकारावर कोणाचा भरंवसा असो किंवा नसे | मोहरी-- हा गांव भोर संस्थानांत नसरापुरापासून सुमारे दोन तीन मैलांवर असून तेथील अमृतेश्वराचे स्थान फार पुरातन काळापासून प्रसिद्ध आहे.