पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२। पानसे घराण्याचा इतिहास. ७. गोविंद विश्वनाथ व रामाजी गांवखंडेराव. विसाजीपंत वारल्यावर त्यांचा एक पुत्र गोविंदराव म्हणून होता, तो मोठा झाल्यावर रोजगारानिमित्त कोंकणांतून निघून पुण्यास आला. या वेळी पुण्यास शिवाजी महाराज यांनी स्थापिलेल्या स्वराज्याचा अंमल बसून त्यांच्यातर्फे तेथे नारो सुंदर या नांवाचा सुभेदार काम करीत होता. त्यास गोविंदरावाने आपली सर्व हकीकत सांगितली, तेव्हा त्याने गोविंदरावाच्या नांवाचे कुळकरण चालविण्याबद्दलचे आज्ञापत्र दिले. परंतु, गोविंदरावाने स्वतः कुळकरण न चालवितां आपला एक गोत्रज (भाऊ) रखमाजी वापूजी पानसे म्हणून होता, त्यास गुमास्ता नेमून त्याच्याकडे कुळकरणाचे काम सोपविले. त्या नंतर रामाजी गांवखंडेरावाने, शिवाजी महाराजांकडे जाऊन खोटें च सांगितले की, सोनोरीचे कुळकरण आपल्याकडे पांच पिढ्यांपासून आहे व पानसे बळजबरीने कुळकरण करीत आहेत; महाराजांनी हा वाद तोडण्यास नारे सुंदर सुभेदार यांस सांगितले. परंतु गोतसभा भरून जो निवाडा व्हावयाचा तो झाल नाही. असे असतां रामाजीने सोनोरीस येऊन रखमाजी गुमास्त्यास खोटे च सांगितले की, शिवाजीमहाराजांनी आपल्या नांवानें कुळकरण केल्याचे आज्ञापत्र दिले आहे व तसाच ठाणेदाराचा हि हुकूम आहे; तरी तू माझे ( रामाजीचे ) कुळकरण आहे असे लिहून दे. पण रखमाजीने ते ऐकलें नाहीं. गोविंदरावास त्र्यंबकराव नांवाचा एक वडील भाऊ होता. रखमाजीने ठाणेदाराकडे अर्ज केला की, सोनोरीचे कुळकरण त्र्यंबक विश्वनाथाचे आहे; रामाजीचा कांही संबंध नाहीं. त्र्यंबक विश्वनाथ हे पुण्याकडे सुभ्याचे कचेरीत कामावर होते. त्यांचे व संभाजी मोहिते ( शहाजी राजांचे मेव्हणे ) यांचे वांकडे होते, त्यामुळे हा वाद पुढे चालला नाही. त्यानंतर अफझुलखानाची मोहीम व शाएस्ताखानाची स्वारी झाली. या दोन मोहिमांमुळे पुणे प्रांत वराच उध्वस्त झाला. तेव्हां महाराजांनी प्रजेस पुन्हा वसती करण्यासाठी कौल ( अभयपत्रे ) दिले. त्या वेळी गोविंद विश्वनाथ हे हजर होते; रामाजी गांवखंडेराव गैरहजर होता. तो औरंगाबादेस मोंगलाकडे जाऊन मिळाला. मध्यंतरी, मोंगलांचा अंमल पुणे प्रांतावर असतां रामाजीने औरंगाबादेहून मोंगली सुभेदाराचा हुकूम सोनोरीच्या मुकदमास व पुणे प्रांताच्या देशमुख देशपांड्यास आणला कीं, रामाजीच्या व गोविंद विश्वनाथाच्या तंट्याचा निकाल करणे. तेव्हां पुण्याच्या ठाणेदाराने लोणी, आळंदी, पिंपळे, बनपुरी, आंबोडी, सोनोरी, सासवड, दिवे, सुपे व कुंभारवळण या दहा गांवांतील मिरासदारांच्या लेखी साक्षी आणविल्या. त्यांत साक्षीदारांनी खरा च मजकूर लिहिला होता. “ दिवें वे सोनोरी येथील ज्योतिष व कुळकरण मूळचे गिधव्यांचे, त्यांनी पानशांस मिरास करून दिले. लुखोबाचा मामा सासवडकर दाणी याचे मार्फतीने कृष्णाजी गांवखंडेराव यास गुमास्ता नेमिला होता. तो मालक नसून पानशाच्या वतीने मुतालिक ( गुमास्ता ) होता." असा मजकूर या साक्षीपत्रांत होता. तो पाहून पुण्याच्या ठाणेदारानें कुळ