पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१ प्रकरण दुसरें. । ६. रामाजी गांवखंडेराव व विसाजी पानसे यांचा वाद, | वरील प्रकार घडल्यानंतर काही दिवसांनी सोनोरी गांवचा नाईकजी काळे पाटील वारला व त्याचे हंसाजी आणि रत्नोजी नांवाचे दोन पुत्र पाटिलकी करू लागलेत्यांचे कारकीर्दीत एकदां मोठा दुष्काळ शके १५५१ चा पडला. त्या दुष्कळांत विसाजी पानसे यांच्या घरास आग लागून त्यांत त्यांची सर्व चीजवस्त जळाली. तींत गिधव्यांचे मूळचे पहिले लक्ष्मीधर भटास दिलेलें इनामपत्र व म्हैसळे येथील दिव्यांतील थळपत्र वगैरे महत्त्वाचे सर्व कागद जळाले. विसाजीस चार भाऊ होते हैं वर आलें च आहे. इतक्यांच्या कुटुंबाचा योगक्षेम सोनोरीस राहून चालविणे जड जाऊ लागले. तेव्हां विसाजीपंत हे रोजगारानिमित्त पुण्यास आले. त्या वेळी हंसाजी व रत्नोजी पाटील हे हि पुण्यास सरकारी कामानिमित्त आले होते. सोनोरीचे कुळकरण गुमास्ते या नात्याने कृष्णाजी गावखंडेरावाकडे होते हैं मागे सांगितले च आहे. या सुमारास कृष्णाजी चारला होता व त्याचा मुलगा रामाजी हयात असून, तो च पानशांच्या तर्फे गुमास्ता म्हणून सोनोरीचे कुळकरण चालवीत होता. रामाजी गांवखंडेराव हा हि, पानसे व पाटील पुण्यास आले, त्या वेळी पुण्यास आला होता. या वेळी, पुणे प्रांत, शहाजी भोसले यांच्या जहागिरीत असून त्यावर त्यांच्या तर्फे दादोजी कोंडदेऊ हे सुभेदार होते व ते पुण्यास च रहात होते. पुण्यास हंसाजी, रत्नोजी, रामाजी व विसाजीपंत या सर्वांच्या भेटी झाल्या. तेव्हां पाटील बंधू विसाजीपंतास म्हणाले की, तुमच्या बंधू (लुखोबा ) चे व आमच्या बापा ( नाईकजी ) चे भांडण होते; ते त्यांच्याबरोबर गेले. आपणांस आतां आपसांत भांडण्यास काही कारण नाहीं. आपण दोघे मिरासभाऊ आहो. तुम्ही सोनोरीचें ज्योतिष व कुळकरण सुखाने खाणे, त्यास विसाजीपंत कबूल झाले. मग त्यांनी रामाजी गांवखंडेराव याच्यापाशीं कुळकरणाचे दप्तर मागितलें. रामाजीनें आठ दिवसांनी दफ्तर आणून देतों, म्हणून मुदत मागितली व तो सोनोरीस परत आला. तेथे हंसाजी पाटलाचा आणीक एक भाऊ होता, त्याचे नांव हौजी होते. रामाजीने त्याला वश करून घेऊन सांगितले की, तू पाटिलकी कर व मी कुळकरण करतो आणि पानसे नुसते (हल्लीं चालवितात तसे ) जोसपण चालवितील. में तें कबल केले; पण त्यामुळे हंसाजी व हौजी यांच्यांत तंटा वाढला. रामाजीने हे पाहन कर्नाटकांत पलायन केले. तेव्हां विसाजीपंतानें हंसाजीस या एकंदर प्रकाराबद्दल ठपका दिला; पण हंसाजीचे हौजीपुढे कांहीं चाललें नाही. त्यामुळे विसाजीपंतानें सोनोरी सोडून कोंकणांत जाऊन व्यापार सुरू केला. इकडे हंसाजी व हौजी यांचा तंटाविकोपास जाऊन हौजीनें हंसाजीस ठार मारले. त्यानंतर कांही दिवसांनीं विसाजीपैताचा हि कोंकणति अंत झाला.