पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२० पानसे घराण्याचा इतिहास. भरविले. त्याने त्यांस सांगितले की, पानसे हे या दोन गांवांच्या दोन्ही वृत्ति बळ. जबरीने उपभोगितात; त्या वास्तविक तुमच्या आहेत. हे ऐकून ते गिधव्याचे वंशज काशीहून सोनोरीस आले. त्यांनी लुखोबाजवळ तपास केला. तेव्हां लुखोबाने त्यांस लक्ष्मीधर यांस पूर्वीच्या गिधव्याने दिलेलें इनाम-पत्र दाखविले व त्यांची खातर केली. यामुळे या गिधव्यांनी हि लुखोबा व विसाजी यांना आपल्या नांवांनीं दुसरे तसेच पत्र करून दिले. ते शके १५४९ मधील असून त्यांत पूर्वीच्या पत्राचा उल्लेख आहे. शके १५४९ मधील या गिधव्यांची नांवें रंगो त्र्यंबक व गणेश त्र्यंबक अशी आहेत. हे दोघे भाऊ संन्यास घेऊन काशीख राहिले होते; त्यांनी लुखोबास वर सांगितल्याप्रमाणे इनामपत्र करून दिल्यानंतर ते पुन्हा काशीस परत गेले. त्यानंतर कांहीं दिवसांनी लुखोबा हे वारले. ५. म्हैसळे येथील दिव्य. लुखोबा वारले तरी नाईकजी पाटील व पानसे यांचे भांडण मिटले नाही. या तंटेभांडणांत आणखी एक भानगड उपस्थित झाली. जेजुरीच्या खंडोबाचा एक भक्त पाडांगला आडनांवाचा होता; पानसे व पाटील यांचे भांडण चालू असतां त्याचा फायदा घेऊन पाडांगलाने सासवडच्या सरकारी मोकाशाकडे तक्रार केली की, “ सोनोरी व दिवें. या दोन्ही गांवांच्या ज्योतिष-कुळकरणाच्या वृत्ति प्राचीन काळापासून आपल्या आहेत, म्हणजे गिधव्यांच्या हि पूर्वीपासून त्या आपल्या असून गिधव्यांचा व पानशांचा त्या वृत्तींशी कांहीं एक हक्क-संबंध नाही. यावेळी सासवडचा मोकाशी राघो निंबाजी म्हणून होता. तो हि जेजुरीच्या खंडोबाचा भक्त असून पाडांगल्याचा स्नेही होता. पाडांगल्याने या स्नेहाचा फायदा घेऊन राघोजी पुढे फिर्याद नेली. त्या वेळी विसाजी परशराम पानसे जिवंत होते. पाडांगल्यांची व राघोजीची ओळख होती तरी राघोजीने दिव्य करण्याचा निकाल दिला. त्याप्रमाणे कोंकणांत म्हसळे येथील श्रीअमृतेश्वराच्या देवालयांत हे दिव्य झाले.( माहिती प्र० २-८ मध्ये पहावी). विसाजी पानशांनीं दिव्य करून रवा काढला. अर्थात् पानसे खरे झाले, व पाडांगला खोटा ठरला. म्हैसळच्या थळक.. न्यांनी पानसे खरे झाल्याचे थळपत्र (म्हणजे दिव्यांतील निवाडपत्र ) करून दिले. त्यास अनुसरून सासवडच्या ( राघो निंबाजी ) मोकाशाने हि विसाजीच्या तर्फे च निकाल दिला.

  • म्हैसळे हा गांव मुरूड जंजियाजवळ आहे. या गांवीं फार पुरातन व प्रसिद्ध असे शंकराचे स्थान असून त्यास अमृतेश्वर असे म्हणतात.

- दिव्यांतील वतनपत्र–पानशांचे घरास आग लागली त्यांत हे जळून गेलें (परिशिष्ट-१ पहा ). शिष्ट-1 पहा ). .. . ..।