पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण दुसरें. मुलगा नारोबा नांवाचा झाला. तो जाणता झाल्यावर सोनोरीचे कुळकरण करू लागला. परशुराम लक्ष्मीधर यांस. सहा पुत्र झाले; त्यांच नांवें लुखोवा, रामाजी, विसाजी, कृष्णाजी, केसोपंत व रखमाजी अशी होती. त्यांत लुखोवा वडील असल्याने वास्तविक सोनोरीचे कुळकरण त्याच्या च कडे यावयाचे, परंतु परशुरामपंत चारले त्यावेळी हे सहा भाऊ लहान होते. त्यामुळे वर सांगितल्याप्रमाणे त्यांचा चुलत भाऊ नारोबा याकडे च ते काम राहिले. विसाजी परशुराम यांचे मामा सासवड येथील राहणारे “ दाणी' उपनांवाचे होते; त्यांची कांही शेतजमीन वगैरे मिळकत सोनोरीस होती. या दाणीनें कृष्णाजी गांवजी गांवखंडेराव नांवाच्या माणसास आपला मानस पुत्र म्हणवून त्याच्याकडे आपली सोनोरी गांवची शेते खंडानें लावून दिली होती. दाणीने लुखोबा आदिकरून आपले सहा भाचे लहान असल्याने सोनोरीच्या कुळकरणावर त्यांची अनावस्था संपेपर्यंत या कृष्णाजी गांवखंडेरावाची गुमास्ता म्हणून नेमणूक केली. एक दोन वर्षे झाल्यावर लुखोबादि बंधु जाणते होऊन त्यांचे तत्कालीन ठरलेले शिक्षण हि पूर्ण झाले. तेव्हां पूर्वी ठरल्याप्रमाणे त्यांनी कृष्णाजीस काढून टाकून सोनोरीचे कुळकरण आपल्या हाती घेतले. दिव्याचे कुळकरण या पूर्वी च त्यांनी आपल्याकडे घेतले होते. .. या नंतर कांही दिवसांनी सोनोरीचा पाटील नाईकजी काळे व लुखोबा यांत कुळकरणाच्या मुशाहि-यावरून भांडण उपस्थित झालें, व त्यांत नाईकजीनें लुखोबास हाणमार केली. तेव्हां लुखोवाने वैतागानें कुळकरणाचे काम सोडून दिले, व तो दिव्यास जाऊन राहिला. त्यावर नाईकजीने कृष्णाजी गांवखंडेरावास बोलावून आणून त्याच्याकडे फिरून ते काम दिले. तेव्हां कांही दिवसांनी लुखोबाने कृष्णाजीस सांगितले की, मी मुद्दाम पाटलाच्या रागावर काम सोडले असतां, तू हे काम करतोस, हे चांगले नाहीं लखोबाने असे सांगितल्यावर कृष्णाजीनें काम करण्याचे बंद केले व तो सासवडास जाऊन राहिला. तेव्हां दाणीनें लुखोवाची समजूत केली की, अशाने वृक्तीचे नुकसान होते. तुमचे व पाटलाचे भांडण मी मिटवतों तोपर्यंत, कृष्णाजसि गुमास्ता ठेवावे. ते लुखोबानें कबूल केले. परंतु नाईकजी व लुखोबा यांच्यांतील तंटा दाण यांस अखेरपर्यंत मिटावतां आला नाहीं. - या नंतर काही दिवसांनी सासवडचा एक रहिवासी दत्तो राखे नांवाचा होता, तो नाईकजी पाटील याच्या बाजूचा होता. तो दिव्यास येऊन लुखोबाकडे उतरला, त्याची व लखोबाची नाईकजीच्या बाबतींत बोलाचाली होऊन मारामारी झाली. व त्यांत लखोबांनी दत्तो राखे याच्या तोंडात मारली. त्यामुळे पुढे दोबाचा मुलगा रंगभट राखे रन काशीस गेला व तेथे त्याने गिधव्यांचा शोध केला. लक्ष्मीधरास ज्या गिधव्यांनी सोनोरी व दिवे येथील वृत्ति इनाम दिल्या होत्या त्यास पुत्र नव्हता. त्याचे वंशज मात्र तेथे नांदत होते. त्यांची भेट राखे याने घेतली व त्यांचे मनांत लुखोबा विरुद्ध बरेंच