पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८ पानसे घराण्याचा इतिहास. किंबहुना आसपासच्या वीस पंचवीस कोसांच्या टापूंत या शास्त्रांत त्यांचा हात धरणारा कोणी नव्हता. ही त्यांची कीर्ति गिधवे यांस माहीत होती; शिवाय, लक्ष्मीधरांना मागे सांगितलेल्या दहा गांवांपैकीं कांहीं गांवांचे जोसपण व कुळकरण मिळाले होते च. हे त्यांचा पणजा परसावा ऊर्फ परशुरामपंत भुताजी याने कमाविल्याची हकीकत मागे आली च आहे. वरील दहा गांवांपैकी कांहीं गांवें लक्ष्मीधराच्या चुलत्याच्या वांटणीला गेली होती व कांहीं त्यांच्या स्वतःच्या वाट्यास आली होती. सारांश, लक्ष्मीधर हे खाऊन पिऊन सुखवस्तु व विद्वान् होते. ही यांची माहिती गिधन्यांना लागल्यामुळे त्यांनी आपली धाकटी मुलगी देऊन लक्ष्मीधरास आपले जांवई करण्याचे निश्चित् केले आणि लक्ष्मीधराच्या घराण्यांतील वडील मंडळींची या योजनेस त्यांनी संमति मिळविली. यांत आणखी एक गोष्ट गिधव्यांनी साधली. परशुराम भुताजी ( लक्ष्मीधराचे पणजे ) पुणे प्रांती आल्यावर व त्यांनी दहा गांवांच्या वरील सांगितलेल्या वृत्ति संपादन केल्यावर या गिधव्यांची कुलोपाध्यायाची हि वृत्ति संपादन केली होती. लक्ष्मीधरास जांवई केल्याने कुलोपाध्यायास कन्यादान केल्याचे हि पुण्य गिधव्यांचे पदरांत अनायासे पडणार होते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन गिधव्यांनी आपली धाकटी मुलगा लक्ष्मीधर यांस दिली. काही वर्षांनी गिधवे हे वयोवृद्ध झाले. स्वतःस पुत्र नाहीं असे पाहून त्यांस संसाराचा वीट आला आणि मग काशीवास करावा असे त्यांनी ठरविलें. हा बेत नक्की झाल्यावर त्यांनी आपल्या पांच गांवांच्या वृत्तीचे वांटे केले त्यांपैकी तीन गांवांच्या वृत्ति वडील जांवई अत्रे यांस इनाम दिल्या आणि मौजे दिवें व मौजे सोनोरी या दोन गांवांच्या वृत्ति धाकटे जांवई लक्ष्मीधर यांस वंशपरंपरा इनाम करून दिल्या व आपण कुटुंबासह काशीस निघून गेले. कांही दिवसांनी त्यांचा अंत काशीस च भागीरथीतरी झाला. लक्ष्मीधरांस या दोन गांवांच्या दोन वृत्ति कधी मिळाल्या त्याची नक्की मिति मिळत नाहीं. तत्रापि परिशिष्ट १ यांत आलेल्या उल्लेखावरून मागें. सांगितल्याप्रमाणे हा काळ शके १५२१ च्या आधीचा असावा येवढे मात्र खास. । लक्ष्मीधर हे वैदिक असल्याने त्यांचे लक्ष्य कुळकरणपणाकडे विशेष नसे, म्हणून त्यांनी दिवे आणि सोनोरी येथील जोसपण संभाळले आणि या दोन गांवांचे कुळकरण चालविण्यास एक गुमास्ता ठेविला. लक्ष्मीधरांस तीन पुत्र झाले. त्यांत परशुराम ऊर्फ परसावा हा पहिला, विठोबा हा दुसरा व बाबाजी हा तिसरा होता. लक्ष्मीधर हे वृद्ध झाल्यावर त्यांनी वृत्ति चालविण्याचे काम मुलांकडे सोपविले. त्यांनी परशुरामास माजे दिवे येथील कुळकरण करण्यास नेमिलें. बाबाजी यास भिक्षुकी शिकविली होती, त्यामुळे तो दोन्ही गांवांचे जोसपण करी. विठोबाचे लक्ष्य व्यापारांत असल्यामुळे तो नेहमी बाहेर गांव धंद्याकरितां हिंडत असे. सोनोरीचे कुळकरण चालविण्यास कोणी नसल्यामुळे वर सांगितलेल्या गुमास्त्याकडे च ते काम कायम केले. विठोबाला एक