पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण दुसरें...? १७ | भुतोपंतांचे दोन ठिकाणी मात्र ओझरते उल्लेख आढळतात, पण त्यांचा काल व प्रसंग स्पष्टपणे दिलेला कोठेच सांपडत नाही. मागे सांगितले आहे की, परशुरामपंतांनी दहा गांवांचे ज्योतिषकुळकरण संपादिले होते; या दहा गांवांपैकीं मौजे भवाळी येथील रहिवासी भवाळ यांनी परशुरामपंतांच्या पश्चात् भुतोपंताच्या वेळी भांडण उपस्थित केले. त्यांचे म्हणणे असे होते की, भवाळी, तोंडल व गुणंद या तीन गांवांच्या ज्योतिष कुळकरणाच्या वृत्ति मूळ आमच्या ( भवाळांच्या ) आहेत; त्यांशीं पानशांचा संबंध नाहीं. भुतोपंतांचे म्हणणे या वृत्ति आपले वडील परशुरामपंत यांनी मिळविल्या. भवाळाचा त्यांत संबंध नाही. या दोहोंतील वाद सरकारांत जाऊन सरकारानें तो पंचायतीकडे सोपविला. तेव्हां पंचायतीने त्या दोघा वादीप्रतिवादींस दिव्य करावयास सांगून तंटा मिटविण्याची तोड. काढली ( दिव्याचे वर्णन प्र० २-८ मध्ये पहावे. ). हे दिव्य मौजे मोहरी तर्फ गुंजणमावळ येथे झाले. हे गांव त्या काळी दिव्य करण्याबद्दल प्रख्यात असे; येथे पुष्कळ वेळा दिव्ये झाल्याचे उल्लेख जुन्या कागदपत्रांतून आढळतात. पानसे व भवाळ या दोहोंपैकी पानसे यांनी दिव्य केले व त्यांत भुतो परशराम पानसे हे दिव्यांत उतरून खरे झाले आणि भवाळ हे खोटे झाले. अर्थात् वरील गांवांच्या ज्योतिष व कुळकरणाच्या वृत्ति भुतोपंत पानसे यांच्या ख-या ठरल्या. भुतोपंताचे एवढे च ओझरते उल्लेख सांपडतात. या भुतोपंताचा दुसरा मुलगा परशुराम उर्फ परसावा म्हणून होता हे वर आलें च आहे; त्या परसावास लक्ष्मीधर नांवाचा एकुलता एक मुलगा होता. या च लक्ष्मीधरानें मौजे सोनोरी येथील ज्योतिष व कुळकरण या दोन बृत्ति संपादन केल्या; पहिल्या प्रकरणांत सांगितलेले लक्ष्मीधर ते हे च होत. ४. सोनोरी व दिवे येथील वृत्ति. (लक्ष्मीधरांचा उद्य.) लक्ष्मीधर हे चांगले व्युत्पन्न वैदिक होते. त्यांच्या वेळी सोनोरी येथे • गिधवे' या आडनांवाचे एक ब्राह्मण घराणे होते. त्या घराण्याकडे मौजे सोनोरी येथील ज्योतिष व कुळकरण या दोन वृत्ति फार काळापासून मिरासी चालत होत्या. सोनोरी प्रमाणे च मौजे दिवे येथील हि ज्योतिष व कुळकरण, या गिधव्यांकडेच होते. या दोन गांवांचा उल्लेख एका अस्सल वतनपत्रांत ( परिशिष्ट क्रमांक २) आला आहे. या खेरीज दुस-या एंका कागदांत दिवे, सोनोरी, चांबळी वगैरे पांच (आणीक दोन गांवांची नांवें दिली नाहीत; कागदांत नुसते वगैरे'च म्हटले आहे. ) गांवांचे गिधवे हे कुळकरणी होते असा उल्लेख आला आहे. त्याच कागदांत पुढे नमूद केलेली हकीकत दिली आहे. लक्ष्मीधराच्या काळी जे गिधवे उपनांवाचे गृहस्थ होते, त्यांस पुत्रसंतति नसून फक्त दोन मुलीच होत्या. त्यांपैकी थोरली मुलम चवळीचे ‘अत्रे घराण्यांत दिली होती. लक्ष्मीघर हे सोनोरीच्या पंचक्रोशीत विद्वान् वैदिक म्हणून फार प्रख्यात होते. त्या पंचशीत