पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/4

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रस्तावना.

  • प्रस्तुत ग्रंथाचे लेखक रावबहादुर आप्पासाहेब पानसे यांनी आपल्या ग्रंथांत प्रस्तावना लिहून देण्यासंबंधाने आम्हांस अतिशय निकडीची विनंती केली. प्रस्तावना ही वाचक व ग्रंथांतील संकलित माहिती यांच्यांतील दुवा असून ती लेखकाच्या विशेष हेतूचे व परिश्रमाचे आविष्करण करण्याकरितां लिहिण्यांत येते, अशी आमची समजूत .

आहे. त्या दृष्टीने पाहतां रावबहादुरांनी संकलित केलेला ‘पानसे घराण्याचा इतिहास इतका उज्ज्वल व महाराष्ट्रीयांच्या परिचयाचा आहे की, त्यास प्रस्तावनेची जरूरी नाहीं. तथापि परंपरेस अनुसरून, त्यांनी केलेल्या विनंतीस मान देणे अनेक कारणांमुळे आम्हांस भाग पडले. प्रस्तुत प्रस्तावना ही, पानसे घराण्यासंबंधाने आमच्या ठिकाणी वसत असलेला उत्कट अभिमान व रावबहादूर पानसे यांनी आपल्या उतार वयांत केलेल्या प्रयत्नाबद्दल आदर यांचे द्योतक आहे. इतके सांगितले म्हणजे पुरे. मनुष्यमात्राचा स्वभावच असा आहे की, त्यास स्वतःच्या कुलाचा अभिमान असतो कोणाचा तो कृतींत दिसतो व कोणाचा तो दिसून येत नाही इतकेच. ज्यांच्या ठिकाणी स्वकुलाभिमान असल्याचे दिसून येत नाही, त्यांच्यांत तो नसतो असे म्हणतां येणार नाही. असे होण्याची अनेक कारणे संभवतील. अमुक थोर पुरुष माझ्या कुळांत होऊन गेले अथवा मी त्यांचा वंशज आहे असे स्वाभिमानाचे उद्गार अनेक वेळ आपण ऐकतों, व या मनोवृत्तांतच वरील विधानाची सत्यता दिसून येते. स्वराज्यपराङ्मुख झालेल्या आपणां महाराष्ट्रीयांमध्ये आज एक प्रकारची उदासीनता उत्पन्न झाल्याचे दिसून येते. आपले पूर्वज कसे, हा विचार मनांत आला म्हणजे या मानसिक औदासीन्यांत भर पडते, आणि म्हणूनच की काय, आपल्या पूर्वजांबद्दल योग्य तो अभिमान दाखविला जात नाही. राष्ट्राचा अभ्युदय होणे जरूर असल्यास हे औदासीन्य घालविण्यास आपण केव्हांतरी आरंभ केलाच पाहिजे. सुदैवाने आपणांस अत्यंत उज्ज्वल अशी इतिहास - परंपरा आहे. ही परंपरा शोधून काढण्यास फार प्राचीन काळाकडे जाण्याचे कारण नाही. सुमारे शंभर सवारों वर्षांपूर्वीच आपल्या महाराष्ट्रांत स्वराज्य नांदत होते. आपल्यामध्ये नवचैतन्य उत्पन्न होण्याकरितां आपण आपल्या पूर्वजांच्या तेजस्वी इतिहासाकडे दृष्टि वळविली पाहिजे. लेखकाच्या शब्दांत सांगावयाचे म्हणजे * पूर्वतिहासाच्या अवलोकनाने स्वदेशाभिमान जत होतो, पूर्वजांच्या तेजस्वी कृतींची आठवण मनांत प्रेरणा उत्पन्न करते व प्रस्तुत परिस्थितीत यशस्वी भविष्यकाळाचा मार्ग दाखविते. वरील विचारसरणीस अनुसरून पाहता आपल्याकडे विशिष्ट घराण्यांचे इतिहास आहे. अशा त-हेच्या वाड्मयांत अC जनतेप येण्यास अलीकडे च सुरवात झा घराण्याच्या इतिहासास अग्रस्थान मिळते. त्यानंतर गोखले, रास्ते वगैरे घरा