पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण दुसरें. १५ त्यांनी, आपण मुलाला संभाळण्यास व त्याला आपल्या मुलाप्रमाणे वागविण्यास तयार आहों, असे कुणबिणीस सांगितले. त्यावर तिने त्यांच्यापासून शपथ घेऊन त्यांच्या हवाली परशुरामास केले. तेव्हां वाघांनी आपल्या पत्नीस बोलावून तिला ही सर्व हकीकत सांगितली; ती ऐकून पत्नीस हि फार आनंद झाला. व तिने आपण परशुरामाची धर्माची आई होण्याचे नक्की केले. या प्रमाणे परशुरामावरील गंडांतर कायमचे टळलें. त्यांत हि दैवयोग असा की, वाघ हे हि पण पानसे यांच्या प्रमाणे च देशस्थ ब्राह्मण होत. दोन तीन दिवस तेथे राहून कुणबीण तेथून परत निघाली व कांहीं दिवसांनीं । परत पानगांवीं येऊन तिने परशुरामाच्या मातोश्रीस ही सर्व गोष्ट सांगून तिची काळजी दूर केली. | ही त्या तिखांडे कुणबिणीची स्वामिभक्तीची गोष्ट वाचून कोणाला स्वराज्यांतील त्या स्वामिभक्त पन्ना दाईची आठवण होणार नाहीं बरें ? राजपुतान्यांतील पन्नेची गोष्ट पुष्कळांच्या आठवणीची आहे. परशुरामाच्या आईने कुणबिणीचा हा उपकार जाणून तिला आपल्या वाड्याशेजारी एक घर बांधून दिले. त्या घरांत अद्यापपर्यंत या तिखांडे बाईचा वंश नांदत आहे. परशुरामाच्या आईसंबंधी पुढील हकिकतीची नोंद आढळत नाहीं. परंतु काही दिवसांनी ती इंदापुरास आपल्या मुलाजवळ आली असली पाहिजे व तेथेच तिचा अंत झाला असावा. याप्रमाणे पानसे यांच्या एका शाखेचे आगमन पुणे-शिरवळ प्रांती झाले. मेंगाजी यांचा काळ मागें शके १३८० ते १४२० असा दिला आहे. त्यांचे पुत्र भुतोपंत यांचा काळ त्या मानाने शके १४०० ते १४४० चा येतो आणि त्यांचा एकुलता एक मुलगा परशुराम याचा जन्म साधारण शके १४३० च्या सुमारास येतो. म्हणजे परशुराम पानसे हे पुणे-शिरवळ प्रान्ती शके १४३२।३३। किंवा ठोकळ मानाने १४४० च्या सुमारास आले. २. परशुरामपंत पानसे. वर सांगितलेले परशुरामपंत ऊर्फ परसावा यांना शेळगांवकर वाघ आडनांवाच्या कुलकरण्यांनी आश्रय दिला व त्यांना आपल्या मुलाप्रमाणे संभाळून तत्कालीन आवश्यक असलेले शिक्षण हि दिले. वाघांना पुत्र नव्हता हे मागे सांगितलें च आहे, त्यांना फक्त एक मुलगी होती. त्यांची वृद्धावस्था झाल्याने या पुढे संततीची आशा खुटली होती. त्यामुळे वाघांनी आपली मुलगी आपल्यापासून दूर होणार नाहीं व परशुरामाचा हि सहवास आपल्याला अंतरणार नाही अशी युक्ति काढली. त्यांनी परशुरामाची घरची सर्व माहिती काढली; तींत नांवे ठेवण्यासारखे कोणतेच न्यून आढळलें नाहीं. वाघांनी परशुरामाचा व्रतबंध त्यावेळच्या चाली प्रमाणे सातव्या वर्षी केला आणि नंतर त्याला आपली मुलगी देऊन घरजांवई केले. या नंतर १०।१२ वर्षे परशुराम हा श्वशर गृहींच रहात होता. त्यानंतर तो शिरवळ येथे रहावयास गेला.