पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

:१४ पानसे घराण्याचा इतिहास. नाही. कारण, सध्या तिच्या समाधानाला आधार काय तो एक परशुराम च होता. त्यांत हि तो अगदी लहान, तेव्हां त्याला आपल्यापासून दूर करून आपण एकटें रहावें ही गोष्ट तिच्या दुःखाने पोळलेल्या अंतःकरणास मानवेना. परंतु, तिखांडे वाईने सर्व परिस्थिति समजून सांगितल्यावर, व आपण हट्टानें परशुरामास येथे ठेवून घेतल्यास कांही दिवसांनी त्यास कायमचे च मुकण्याचा प्रसंग येईल त्यापेक्षां कांहीं वर्षे त्याचा वियोग सहन करणे चांगले, असा पोक्त विचार करून तिने परशुरामास पळवून लावण्याविषयी आपली कबुली दिली. त्या नंतर एके दिवशी रात्रीं कुणबिणीनें परशुरामास गुपचूपपणे आपल्या घरी आणले. नंतर दुसरे दिवशी सकाळी शेतावरील लोकांस भाकरी पोहोंचविण्यासाठी भाकरीची पाटी डोकीवर घेऊन ती निघाली. भाकच्या पोंचविण्याचे काम तिच्याकडे मधून मधून असल्याने कोणास तिचा संशय आला नाही. सावधपणे गांवांतून बाहेर पडून तिने प्रथम शेताचा रस्ता धरला; पण बरीच दूर गेल्यावर व कोणी आपला पाठलाग करीत नाही असे पाहिल्यानंतर तिने शेताचा रस्ता सोडला व ( पुणे जिल्ह्यांतील ) इंदापूरचा मार्ग धरला. | त्यावेळी प्रवासाची साधने म्हणजे घोडे किंवा गाडी हीं होती, पण ती दोन्ही या प्रसंगी कुणबिणीला निरुपयोगी होती. त्यामुळे पानगांवाहून इंदापूर पर्यंतचा सर्व प्रवास तिने पायी च केला. इंदापूर हे गांव त्या वेळी परगण्याचे असून व्यापाराची उतारपेठ होती. पानगांवच्या थेट पश्चिमेस सुमारे पन्नास मैलांवर इंदापूर आहे. मध्यंतरी सीना व भीमा या नद्या आणि अध्याचा व टेंभुर्णीचा असे दोन डोंगर आहेत. अशा बिकट मार्गातून सावधतेने कुणबिणीने ५।७ दिवसांचा प्रवास करून आपली भाकरीची (!) पाटी इंदापुरास आणली. तेथे आल्यावर तिने एका घराच्या ओट्यावर आपली ती पाटी ठेविली. घराची ओटी, आंगण वगैरे स्वच्छ दिसल्याने हे कोणातरी पांढरपेशाचे घर असेल असे जाणून तिने घरमालकाचा तपास केला. तेव्हां तिला समजलें कीं, ह्या घराचे मालक ब्राह्मण असून ते इंदापूर परगण्यांतील शेळगांवचे कुलकरणी आहेत. या कुलकरण्यांचे आडनांव * वाघ " असे होते. ही माहिती काढल्यानंतर तिने वाघांना हाक मारली व त्यांना आपण कोण व आपल्या भाकरीच्या पाटींत खरोखर काय आणले आहे ह्याबद्दलची सविस्तर माहिती सांगितली. वाचकांना सांगावयास नकोच की, त्या पाटींत निव्वळ भाकच्या नसून, भाक-यांच्या आंत भुतोपंताचा मुलगा परशुराम हा लपविलेला होता. कुणबिणीने प्रवासांत त्याची फार काळजी घेतली होती व त्याची सर्व प्रकारची व्यवस्था हि ठेविली होती. वाघांनी ही हृदयद्रावक हकीकत ऐकल्यावर त्यांचे मन खरोखरच कळवळले. त्यांना आतांपर्यंत पुत्रसंतति नव्हती. अशा वेळी असा आपल्या घरीं आयता चालून आलेला मुलगा पाहून त्यांना ईश्वराच्या लीलेचे कौतुक वाटलें व आनंद हि झाला,