पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पानसे घराण्याचा इतिहास. ३. पुणे-शिरवळ व वाई प्रांतींच्या वृत्त. | ( भुतोपंतांचे दिव्य.) परशुरामपंत मोठे झाल्यावर त्यांनी वाई, व पुणे, ह्या परगण्यांत आणि त्याच्या शेजारच्या शिरवळ आणि जुन्नर परगण्यांत ज्योतिष व कुळकरण या दोन वृत्ति संपादन केल्या. या परगण्यांतील ज्या गांवांच्या वृत्ति संपादन केल्या तीं गांवेः| १ मांडवगण, २ गणेगांव ( शिरूर ), ३ गाथाडी, ४ कालगांव, ५ गणेगांव (परगणे जुन्नर ), ६ नांदगांव, ७ लोणी, ८ भवाळी, ९ तोंडल व १० गुणद. | या दहा गांवांपैकी पहिली दोन गांवें ( मांडवगण व गणेगांव ) सांप्रत शिरूर पेट्यांत असून, या पुढील तीन गांवे ( गाधाडी, कालगांव व गणेगांव ) जुन्नर तालुक्यांत व त्या पुढील एक गांव ( नांदगांव ) भीमथडी तालुक्यांत आहे. लोणी व भवाळी ही दोन गांवें वाई तालुक्यांत असून तोंडल व गुणंद हीं पंत सचीव यांच्या जहागिरीत आहेत. या दहा गांवांच्या ज्योतिष व कुळकरणाच्या वृत्ति परशुरामपंतांनी ज्या मिळविल्या त्या वंशपरंपरेच्या होत्या. त्यामुळे त्या तेव्हांपासून पुष्कळ वर्षेपर्यंत पानसे घराण्याकडे चालू राहिल्या. त्या नंतर कांही काळाने पुणे जिल्ह्यांतील पहिल्या सहा गांवांच्या वृत्ति पानशांच्या हातून कायमच्या च गेल्या. त्या कशा नाहीशा झाल्या त्याचा नक्की शोध अद्यापि लागत नाही. पुढील चार गांवे म्हणजे लोणी, भवाळी, तोंडल व गुणंद येथील ज्योतिष व कुळकरण मात्र अद्यापपर्यंत पानशांकडे चालू आहे. परशुरामपंतांनी या वृत्ति संपादन करून आपला काल सुखाने घालविला. त्यांना भुतावा ऊर्फ भुतोपंत नांवाचा एक च मुलगा होता. परशुरामपंताचा जन्म वर देशविल्याप्रमाणे अजमासे शके १४३० चा असावा. त्यांनी आपल्या वयाच्या तिशी पस्तिशीच्या कालांत में वृत्तिसंपादनाचे कार्य केले. भुतावाचा जन्म शके १४५० च्या आगेमागे धरण्यास हरकत नाही. या भुतोपंतांची माहिती विशेष आढळत नाहीं. त्यांनी जास्त वृत्ति संपादन केल्या होत्या किंवा नाही ते समजत नाहीं. बहुधा त्यांनी आपले आयुष्य शांतपणाने घालवून वरील दहा गांवांच्या वृक्तींचे जतन केले असावे. भुतोपंतांना बाळावा, परसावा व तानाजी या नांवाचे तीन पुत्र होते. या तीन पुत्रांचा वंशविस्तार पुणे प्रान्तांत होऊन त्यांनी व त्यांच्या वंशजांनी पुढे अनेक वृत्ति व इनामें मिळविली; त्यामुळे यांची हकीकत या पुढे एकत्र न देतां निरनिराळी देण्याचे ठरविले आहे. भुतोपंताच्या वरील तीन पुत्रांपैकी मधला मुलगा जो परसावा याचा वंशविस्तार मोठा असल्याने व त्याने सोनोरी में पानशांचे मुख्य गांव मिळविल्यामुळे प्रथम त्याच्या शाखेची माहिती देण्यात येत आहे.