पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

. .. . प्रकरण दुसरे, प्रकर -- -- , पानसे यांचे पुणे-शिरवळ प्रांत आगमन. पहिल्या प्रकरणांत सांगितल्याप्रमाणे पानगांव परगण्याचे देशपांडेपणाचे वतन मेंगाजी पानसे यांनी मिळविल्यानंतर, त्यांच्यांत व पूर्वीच्या गिरी आडनांवाच्या बाटग्या मुसलमान देशपांड्यांच्या घराण्यांत वैर माजलें; आणि गिरी घराण्यानें पानसे घराण्यावर सूड उगवला. मेंगाजी जिवंत होते, तावत्काळपावेतों गिरींचे सूड घेण्याचे कांहीं एक जमलें नाहीं. मेंगाजी वारले व मग गिरांनी उचल केली. मेंगाजींचा, वडील व कर्तृत्ववान् पुत्र भुतोपंत हा होता. म्हणून पहिल्यानें गिरींनी त्याचा खून केला. नंतर त्यांनी संधी साधून पानसे यांच्या घरांतील सुमारे दहा वारा पुरुषांचे खून केले, सखोपंत व विठ्ठलपंत हे हि त्यांत मारले गेले. त्यांच्यांत पुरुष कोणी उरला नाहीं. त्यांची बायकामुलें भीतीने गांव सोडून दुसरीकडे पळून गेली. १. महाराष्ट्रांतील पन्ना. गिरींनी हा जो खुनाचा सपाटा चालविला त्यांतून फक्त एक लहान मुलगा मोठ्या आश्चर्यकारक रीतीनें वांचला गेला. भुतोपंताचा जेव्हां खून झाला, तेव्हां त्यांना एकुलता। एक मुलगा होता; तो फार लहान म्हणजे अवघा वर्षा दोन वर्षांचा होता. भुतोपंताताच्या घरी त्यांच्या आजोबाच्या वेळची एक कुणबणि आश्रित होती. ती मराठा जातीची असून तिचे आडनांव तिखांडे होते. तिची सर्व हयात पानसे यांच्या घरी गेल्याने तिला पानसे मंडळी आपल्या घरच्या मंडळींपैकीच एक, असे वागवीत. पूर्वीच्या काळी अशी मालकाच्या घरी पिढ्यान् पिढ्या टिकून राहणारी नौकर माणसे मोठमाठ्यांच्या पदरी असत. ही माणसे विश्वासू व धन्याच्या घराण्यासाठी वाटेल तें करणारी, प्रसंगी स्वतःचे प्राण हि पण देणारी अशी असत. सांप्रतच्या पिढीस याची कल्पना येणार नाही. कारण, हल्लीं, भाडोत्रीपणा जसा इतर सर्व बाबतींत पसरला । आहे, तसा धनी व नौकर यांच्या संबंधांत हि तो आला आहे. त्यामुळे स्वामिनिष्ठ चाकर व चाकरांची कदर जाणणारे धनी यांचे दर्शनच दुर्मिळ होत चालले आहे. भुतोपंताच्या घरी जेव्हां पुरुषांचे खून भराभर पडू लागले व निर्वंशाची वेळ येऊन ठेपली, तेव्हा तिखांडे कुणबिणीने पुढील युक्त करून पानशांचा वंश कायम ठेविला. याबद्दल त्यापुढील पिढीतील सर्व पानसे मंडळी तिची ऋणी आहेत. भुतोजीपंताच्या या एकुलत्या एक मुलाचे नांव परसावा ऊर्फ परसोजी ऊर्फ परशुरास असे होते. बाईनें परशुरामाच्या आईस सांगितले की, मुलास येथे ठेविल्यास ‘गिरी' मंडळी त्याचा नाश करतील यात शंका नाही, त्यासाठी त्याला येथून गुपचूप पळवून लांब दुरच्या ठिकाणी नेऊन ठेविला पाहिजे. ही मसलत परशुरामाच्या आईस एकाएकी पटली