पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पानसे घराण्याचा इतिहास. गेल्या असल्या पाहिजेत. एकंदरीत मोठ्या श्रमाने मिळविलेल्या या वृक्ती पांच पन्नास वर्षांच्या कालांत पानसे यांच्या घराण्यांतून नाहीशा झाल्या ही मोठी नुकसानीची गोष्ट घडली, एवढे मात्र खरे. पानगांव हे वरील १८ गांवांपासून सुमारे १०।१२ कोसांचे अंतरावर आहे. | मेंगाजी यांचा काल कधी झाला ते समजत नाही, पण तो आजमासे त्यांचे वयाचे चाळिशीचे सुमारास म्हणजे शके १४२० च्या सुमारास झाला असावा. त्यांना भुतोपंत, सखोपंत, व विठ्ठलपंत या नांवांचे तीन पुत्र होते. त्यांची हकीकत देतांना पुणे-शिरवळ प्रांताचा संबंध येतो आणि इतर ब-याच दुस-या गोष्टी मध्ये येतात, त्यामुळे तो मजकूर पुढच्या स्वतंत्र प्रकरणांत दिला आहे. _ । ।