पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण पहिले. ११ ११ साकत, १२ काळेगांव, १३ उंडेगांव १४ तडवेल, १५ वैराग, १६ घाणेगांव, १७ मानेगांव, १८ ते २२ पर्यंतच्या ५ गांवांची नांवे मिळत नाहींत. | या वावसि गांवांचे देशकुळकण म्हणजे देशपांडेपण व खुद्द पानगांव कसब्याची महाजनकी मेंगाजींनी मिळविली. मेंगाजीचा जन्म वीस वर्षांची पिढी या प्रमाणानें शके १३८० ते १३८५ च्या सुमाराचा ठरतो त्या नंतर त्यांनी हे वृत्ति-संघटनाचे कार्य आपल्या ऐन उमेदीच्या म्हणजे शके १४१५ च्या शुमारास केले असले पाहिजे. याप्रमाणे वतन मिळविल्यावर मेंगाजीने पाथरी गांव सोडून आपली कायमची वसती पानगांव येथे केली. | पानगांव येथे पानशांच्या पूर्वीचे जें ब्राह्मण जातीचे वतनदार देशपांडे घराणे त्याचे आडनांव गिरी असे होते. बहामनी राजवटीत में ब्राह्मणघराणे बाटले गेले कारण, मेंगाजीला * गिरी आडनांवाच्या मुसलमान जातीच्या देशपांडे याजकडून वतन मिळाले ” असा मजकूर आमच्या जुन्या कागदांत व मागे सांगितलेल्या शके १६६२ च्या यादीतही आढळतो. गिरी देशपांड्याच्या कडून सरकारचा कांहीं अपराध घडला म्हणून बेदरच्या पातशहाने त्यांच्या कडील देशपांडेपणाचे वतन काढून ते मेंगाजीस दिले असाहि उल्लेख दुस-या एका कागदांत आहे. परंतु सरकारास असे करणे भाग पडण्यास गिरी यांच्या हातून कोणता अपराध घडला ते स्पष्ट कोठेच सांगितलेले आढळत नाही. त्या काळीं सरकारी वसूल थकल्यास अशी वतने जप्त करीत असत. या वेळीं मेंगाजी हे पाथरीस सुखवस्तु राहात असून त्यांचा तेथे जम बसला होता. त्यामुळे सरकारी वसूल वेळच्यावेळी देण्याची हमी देऊन त्यांनी सरकारने जप्त केलेले गिरीचे देशपांडेपण स्वतः विकत घेतले. याप्रमाणे पानगांव परगण्याचे पूर्वीचे देशपांडेपण बाटून मुसलमान झालेल्या गिरी आडनांवाच्या मूळच्या ब्राह्मण घराण्याकडे होते व त्यानंतर मेंगाजी पानशाकडे आले; पण त्यामुळे या दोन घराण्यांत वांकडे आलें आणि गिरींनीं पानशांच्या घराण्यावर चांगला सूड उगविला. तो प्रकार पुढील प्रकरणांत देऊ. | मेंगाजी यांस बाळाजी नांवाचा एक धाकटा भाऊ होता, हे ह्या प्रकरणाच्या आरंभींच आहे. मेंगाजी हे पानगांव राहावयास आल्यावर त्यांनी पानगांव परगण्याच्या देशपांडे. पणाचे काम पाहाण्यास प्रारंभ केला. तेव्हांपासून त्या त्या प्रांतीं पानसे यांस देशपांडे म्हणून लोक ओळखू लागले व हल्लीं हि त्याच नांवाने लोक त्यांस ओळखतात. तिकडे बालेघाटांतील १८ गांवांचे ज्योतिष व कुलकरण करण्याचे काम त्यांनी या बाळाजी वर सोपविलें. बाळाजी हे पाथरीस राहून ते काम करीत. बाळाजीस पुढे पुत्र न झाल्याने त्यांचा निर्वंश झाला .बहुत करून यानंतर २५॥३० वर्षांच्या कालांत वरील १८ गांवांच्या ज्योतिष कुळकरणाच्या वृत्ति पानशांच्या घराण्यांतून निघून दुस-याच्या ताब्यांद