पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१० पानसे घराण्याचा इतिहास. पांच गांवें उस्मानाबाद जिल्ह्यांत आणि पुढील तेरा गांवें बीड जिल्ह्यांत आहेत, या : अठरा गांवांपैकी हल्ली पानसे यांच्याकडे फक्त पहिल्या पांच गांवांच्या च कुळकरण व ज्योतिषपणाच्या वृत्ति चालत आहेत; पुढील तेरा गांवांच्या वृत्ति चालत नाहींत. त्या वृत्त मध्यंतरीच्या काळांत त्यांच्या हातून नाहीशा झाल्या; त्या केव्हां व कशा गेल्या ते निश्चितपणे सजमण्याइतकी तूर्त बळकट साधने उपलब्ध नाहीत. ही अठरा गांवें पूर्वी बालाघाट प्रांतांत होती व गोविंदपंत हे त्या प्रांतांतील पाथरी गांवीं येऊन राहिले. होते, त्यामुळे त्यांना व त्यांच्या मुलांनातवांना या वृत्ति संपादणे सुकर गेले. या अठरा गांवांत पाथरी हे गांव आलं च आहे. ही सर्व गांवें परस्परांपासून सरासरी दोन दोन, तीन तीन, कोसांच्या अंतरावर आहेत. । भुतावा ऊर्फ भुतोपंत पानसे यांचा जम या प्रांती चांगला बसला होता. भुतावाचे आजे गोविंदपंत यांचा काळ आपण मागें शके १३२० ते १३९० असा धरला आहे. त्यांचा मुलगा एकावा यांचा जन्म १३४० च्या सुमारास झाला. त्यांचा मृत्युशक मात्र आढळत नाही. त्यांचे पुत्र भुतावा यांचा जन्म वीस वर्षांची पिढी धरल्यास अज-- मासे शके १३६०।७० च्या दरम्यान झाला असावा असे अनुमान करितां येते. १०. पानगांव परगण्याचे देशपांडेपण. | ( मेंगाजी पानसे यांची कामागिरी. ) भुतावा ऊर्फ भुतोपंत हे नक्की कधी वारले याचा शोध लागत नाही. त्यांना मॅगाजी व बाळाजी असे दोन पुत्र होते. मागे ५ व्या पोट प्रकरणांत उल्लेखलेल्या शके | १६६२ च्या यादींत, मेंगाजी यांनी पानगांव परगण्याचे देशपांडेपण व कसब्याचे महाजनपण चालविल्याचा उल्लेख आहे. ह्या दोन वृत्ति बहुधा मेंगाजी यांनी संपादन केल्या असाव्यात असे वाटते. तत्पूर्वी हीं वतने विशेषतः त्यांपैकी देशपांडेपण हैं एका मुसलमान घराण्याकडे चालत होते अशी माहिती मिळते. ते मेंगाजींनी कसे मिळविलें व केव्हां मिळावले ह्याची जी माहिती मिळते ती अशीः त्या वेळी ( म्हणजे शके १३९० ते १४०० च्या सुमारास ) पानगांव परगणा हा परंडे सरकारांत होता व त्या परगण्यांत बावसि गांवें होतीं. हल्लीं हीं गांवें सोलापूर जिल्ह्यांत वारशी तालुक्यांत असून, ती पानगांवच्या आसपास तीनचार कोसांच्या अंतरावर आहेत. खुद्द पानगांव हे हि बारशी तालुक्यांत च आहे; ते बारशीपासून जवळ असल्यामुळे त्याला बारशी-पानगांव असे म्हणण्याचा प्रघात आज सुमारे तीनशे वर्षांपासून पडला आहे. परंडे परगण्यांतील बावीस गांवांपैकी १७ गांवांचीं नांवेंः-- १ कसबे पानगांव, २ कौरफळे, ३ पडाशंगें,४ सुरडी, ५ मालवंडी, ६ गुणपोली ७ तुर्क पिंपरी, ८ पिंपरी ९ हिंगणी, १० पिवळगांव,